esakal | धक्कादायक! लोखंडी सळाखीने पतीने केला पत्नीचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

धक्कादायक! लोखंडी सळाखीने पतीने केला पत्नीचा खून

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरची (गडचिरोली): कोरची मुख्यालयापासून अंदाजे ३५ किमी अंतरावर पोलिस मदत केंद्र कोटगुल अंतर्गत येत असलेल्या देऊळभट्टी येथे रविवारी (ता. ५) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पतीने पत्नीची लोखंडी सळाखीने खून केल्याची घटना घडली आहे. त्रिपुरारी बंजारे (वय ३५) असे आरोपीचे नाव असून त्याच्या मृत पत्नीचे नाव मंगेश्वरी त्रिपुरारी बंजारे (वय ३०) आहे.

हेही वाचा: गळ्यातील फासासह वाघिणीची भ्रमंती; फासामुळे मानेवर गंभीर जखम

प्राप्त माहितीनुसार आरोपी त्रिपुरारी बंजारे हा छत्तीसगड राज्यातील येथील राजनांदगाव जिल्ह्यातील करमतरा येथील रहिवासी आहे. ही व्यक्ति मानसिकदृष्टया कमजोर असल्यामुळे मुलीच्या वडिलाने आपल्या मुलीला व आपल्या जावयाला आपल्या गावी हवाबदल होईल या कारणाने स्वगावी देऊळभट्टी येथे बोलवले होते.

रविवारी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पत्नी मंगेश्वरी बंजारे जेवण करीत असताना आरोपी त्रिपुरारी याने सळाखीने मारले. जबर वार असल्यामुळे मंगेश्वरी कोसळून खाली पडली. तिला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथे दाखल करण्यात आले. परंतु मंगेश्वरी गंभीर स्थितीत असल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

परंतु गंभीर दुखापस झाल्याने तिचे प्राण वाचू शकले नाही. डॉ. विटनकर यांनी तिला मृत घोषित केले. तिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे करण्यात आले असून मंगेश्वरीला ५ वर्षाचा मुलगा व ३ वर्षाची मुलगी आहे. पुढील तपास पोलिस मदत केंद्र कोटगुल येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाल करीत असून प्राथमिक तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.

loading image
go to top