Anti Corruption : सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जैस्वाल अँटी करप्शनच्या जाळ्यात

तहसीलदासह दोन कर्मचाऱ्यांवर कर्मचारी ताब्यात शासकीय निवासस्थामधुन ३७ लाख रुपये रोख रक्कम केली हस्तगत
Anti Corruption
Anti Corruptionesakal

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपयाची लाच घेतांना अँटी करप्शन रंगेहाथ पकडले असून तहसीलदार सचिन जैस्वाल,चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताठे यांना ताब्यात घेतले आहे.तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या शासकीय निवासस्थानांमधून ३७ लाख ५२ हजार १८० रुपये मिळुन आली तर परभणी येथील अँटी करप्शन,यांनी परभणी निवासस्थानांची घरझडती घेतली असता ९ लाख ४० हजार रक्कम मिळुन आली आहे.

Anti Corruption
Pune News: नरभक्षक बिबटयाला जेरबंद आले यश; वन विभागाने केली कारवाई

अशी एकूण ४६ लाख ९२ हजार १८० रुपयांची मिळुन आली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन वाळुचा लिलाव झालेला असल्यास ते कायदेशीर परवाना घेवुन वाळु वाहतुक करतात. परंतु सध्या वाळु वाहतुकीचा लिलाव झालेला नुसन अवैधरित्या वाळ वाहतुक सुरु आहे.तक्रारदार यांना ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळु वाहतुक सुरु करण्यासाठी यातील आरोपी मंगेश कुलथे यांचेकडुन आरोपी लोकसेवक सचिन जैस्वाल तहसीलदार सिंदखेड राजा यांचे करीता तक्रारदार यांचेकडे एका ट्रॅक्टरसाठी प्रतिमहीना ३५ हजार रुपये लाचेची मागणी होत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.

त्यानुसार ता.१२ एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता,चालक मंगेश कुलथे, यांनी तक्रारदार यांचेकडे तहसीलदार सचिन जैस्वाल यांचे करिता ३५ हजार रुपयांची लाच मागणी करुन सदर लाच देण्यासाठी यातील आरोपी शिपाई पंजाबराव ताठे यांनी प्रोत्साहन देवुन तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांनी सदर लाच रक्कम स्वीकारण्यास संमती देवुन सदर लाच रक्कम चालक मंगेश कुलथे यांचेकडे देण्यास सांगीतले होते.मंगेश कुलथे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेवुन बोलावल्याने त्यांनी ३५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शितल घोगरे पोलीस उपअधिक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा,गजानन शेळके पोलीस उपअधिक्षक अँटी करप्शन ब्युरो वाशिम, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भोसले, एएसआयशाम भांगे, प्रविण बैरागी,विनोद लोखंडे, जगदीश पवार,पोकॉ रंजित व्यवहारे,स्वाती वाणी,नितीन शेटे, मधुकर रगड आदी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com