सोबत खेळणारा मित्र गप्प राहला अन्‌ गेला जीव, वाचा दुर्दैवी घटना...

small boy dies after falling in a field in Yavatmal
small boy dies after falling in a field in Yavatmal

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. शहर असो व गाव प्रत्येक जण आपल्या घरी आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एरवी स्वच्छंद बागडणाऱ्या आणि खेळणाऱ्या लहान मुलांवरही घरी बसण्याची वेळ आली आहे. लॉकडाउन शिथिल होताच नागरिक असो वा मुलं घराबाहेर निघण्यास घाई करीत आहे. लहान मुलांना खेळण्याचा आनंद घेण्याची उत्सुकता अधिक झाली आहे. मात्र, हीच घाई एकाच्या जिवावर बेतल्याची घटना नुकतीच घडली... 

यवतमाळ जिल्ह्यातील गोपालपूर येथील शेतशिवारात राजू मोतीराम आत्राम यांच्या मालकीचे शेत आहे. त्यांच्या शेतात सध्या फवारणी, निंदणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजू आत्राम नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी सोबत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा रोहित आणि मित्रदेखील होता. आत्रात यांचे शेतात कामावर असलेल्या मजुरांकडे लक्ष होते. तर रोहित आणि मित्र हे दोघेही शेतात मनसोक्त खेळात होते. पण नियतीला मात्र दोघांचे आनंदाने खेळणे मान्य नव्हते.

वडील शेती कामात व्यस्त असताना दुपारी रोहित आणि त्याचा मित्र खेळता खेळता शेतात असलेल्या शेततळ्याजवळ येऊन पोहोचले. दोघेही शेततळ्याजवळ खेळत होते. खेळता खेळता अचानक रोहित आत्राम याचा तोल गेला आणि तो तब्बल दहा फूट खोल असलेल्या शेततळ्यात पडला. तो मदतीसाठी आरडाओरड करीत होता. मात्र, कुणालाही त्याचा आवाज गेला नाही. यात रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थही धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठविला. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेच पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक रितेश श्रीवास व विजय चव्हाण करीत आहेत.

मित्राने घरी सांगितली घटना

मित्र शेततळ्यात पडल्याचे पाहून घाबरलेल्या अवस्थेत त्याचा सहकारी कुणाशी काहीही न बोलता घरी निघून गेला. घरी पोहोचल्यावर रोहितच्या मित्राने घडलेली घटना सांगितली. सर्वांनी मिळून थेट शेततळ्याजवळ जाऊन पाहणी केली. पाण्यात खोलवर जाऊन पाहणी केली असता रोहितचा मृतदेह आढळून आला. 

...तर वाचला असता रोहितचा जीव

रोहित आपल्या वडिलांसोबत शेतात गेला असता मित्रालाही घेऊन गेला होता. रोहित आणि त्याचा मित्र शेतात खेळत होते. तर वडील कामात व्यस्त होते. खेळताना दोघेही शेततळ्याजवळ गेले. तिथे खेळताना रोहितचा पाय घसरला आणि शेततळ्यात पडला. रोहित शेततळ्यात पडल्याचे पाहून मित्र घाबरला. तो कुणाला काहीही न सांगता घरी निघून गेला. मित्राने याची माहिती दिली असती तर रोहितचा जीव वाचवता आला असता. 

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com