esakal | रात्री अंगणात खेळत होते चिमुकले, काळ बनून आली गाडी अन् कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Small girl dies in an accident in Chandrapur

गाडी थेट अलस्या हिला जाऊन धडकली. यात अलस्या व अस्मित गंभीर जखमी झाले. एका खड्ड्यात फेकल्या गेल्यान माही बालबाल बचावली. जखमींना गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केल्यानंतर अलस्यचा मृत्यू झाला. अस्मिताची गंभीर अवस्था बघता पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

रात्री अंगणात खेळत होते चिमुकले, काळ बनून आली गाडी अन् कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : रात्री जेवण झाल्यानंतर घराच्या अंगणात चिमुकले खेळत होते. अचानक रोडवरून चालणारा पिकअप अंगणात घुसला. या अनपेक्षित अपघातात सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. दुसरा बालक गंभीर जखमी झाला. तिसरी चिमुकली खड्ड्यात पडल्यान बालबाल बचावली. गावकऱ्याच्या काळजाचे पाणी हिरावणारी ही दुर्दैवी घटना गोंडपिपरी आष्टी मार्गावरील नवेगाव वाघाडे येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम यांचे घर प्रमुख मार्गाला लागून आहे. त्यांची मुलगी अलस्या (७), अस्मित मेश्राम (१०), माही रामटेके (१२) ही बच्चेकंपनी रात्री जेवण झल्यानंतर अंगणात खेळत होते. यावेळी आष्टीवरून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. अन् मुख्य मार्गावरून पिकअप गाडी नालीवरून थेट मेश्राम यांच्या अंगणात घुसली.

हेही वाचा - पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..

गाडी थेट अलस्या हिला जाऊन धडकली. यात अलस्या व अस्मित गंभीर जखमी झाले. एका खड्ड्यात फेकल्या गेल्यान माही बालबाल बचावली. जखमींना गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केल्यानंतर अलस्यचा मृत्यू झाला. अस्मिताची गंभीर अवस्था बघता पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे करीत आहेत. गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेन प्रचंड शोककळा पसरली आहे. 

मायबापाचे दुर्दैव्य

नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम हा सामाजिक कार्यकर्ता. तहसील कार्यालयात अनेकांचे काम करून तो चांगलाच चर्चेत आला. पंढरीची पत्नी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांना अलस्या ही एकूलती एक मुलगी. आईसोबत ती कॉन्व्हेंमध्ये शिकायला जायची. काही वर्षांपासून पंढरीचे स्वास्थ बिघडले होते. कालच्या दुर्दैवी घटनेन एकुलती एक मुलगी गेल्यान त्यांच्यावर आभाळभर दुख पसरले आहे.

अधिक माहितीसाठी - प्रादेशिक हवामान विभागाने दिला पुन्हा इशारा, धानपट्टा भागात होणार हे...

तिचे सुदैव...

मुख्य मार्गावरील नालीवरून पिकअप गाडी अंगणात घुसली. बाजूला असलेल्या शौचालयाला फोडून गाडी अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांच्या अंगावर आली. काही समजण्याच्या पूर्वीच सारच संपलं. अशावेळी अलस्याची नातेवाईक माही शौचालयाच्या खड्ड्यात पडली अन् खड्ड्यावरून पिकअप समोर निघून गेला. यामुळ ती बालंबाल बचावली. 

कामावर नियंत्रण नाही

बामणी ते नवेगाव वाघाडे या नॅशनल हायवेच काम सुरू आहै. नवेगाव वाघाडेपर्यंत मार्गाचे व भूमिगत मोठ्या नालीचेही बांधकाम झालेले आहे. कामाच्या सिमेवर संबंधित कंत्राटदार कंपनीने दिशादर्शक फलक लावले नाही. हा मार्ग प्रचंड रहदारीचा आहे. अशावेळी सदर कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे समोर आले.

क्लिक करा - ऑनलाईन व ऑफलाईन स्तरावर सुरू होणार शाळा, प्रायोगिक तत्वावर केवळ इयत्ता पाचवीपासून सुरुवात

रस्त्यावरील पोलही झाला आडवा

भरधाव पिकअप गाडी मेश्राम यांच्या घरासमोरील भिंती, रस्त्यावरील खांबाला धडक देत उलटला. या धडकेत पिकअप व्हॅनने रस्त्यावरील पोलही आडवे केले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. चिमुरडीच्या मृत्युमुळे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थिती लोकांच्या डोळ्यात पाणी आले. 

संपादन - नीलेश डाखोरे