
गेल्या आठवडाभरात शहरातील मानेवाडा रिंग रोड आमि जयताळा क्षेत्रातील सुमारे 250 गुरे चोरीला गेली आहेत. त्यामुळे गुरे पाळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भांगे ले आऊट, जयताळा रोड, रिंगरोड परिसरातील गायी चोरल्या जात आहेत. यासाठी दिवसा हेरगिरी करून, रात्री चारचाकी गाडीत मोठ्या शिताफीने गायी भरून पळविल्या जात आहे.
नागपूर : शहरातून गुरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून यासाठी लग्झरी कारचा वापर होत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जयताळा रोड परिसरातील दिनेश तुकाराम मांगे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली असून, त्यांची गर्भवती गाय पहाटे साडेतीनला दोन चोरट्यांनी लग्झरी कारमध्ये कोंबुन नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.
शहरात विविध ठिकाणी जनावरे चोरींच्या घटना वाढल्या असून, यात गाभन गायींना लक्ष केले जात आहे. दिवसा ऍक्टीव्हावर येऊन, परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिरने आणि मध्यरात्री येऊन गाडीत गाय भरून चोरी करून नेणे असा गोरखधंदा चोरट्यांनी धरला आहे. शहरातून गुरांची चोरी आता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील मध्यवस्तीच नव्हे तर नव्याने विस्तारत असलेल्या उपनगरांमधील रहिवाश्यांच्या अंगणात बांधलेली गुरे चोरटे लंपास करीत आहेत. गेल्या आठवडाभरात शहरातील मानेवाडा रिंग रोड आमि जयताळा क्षेत्रातील सुमारे 250 गुरे चोरीला गेली आहेत. त्यामुळे गुरे पाळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भांगे ले आऊट, जयताळा रोड, रिंगरोड परिसरातील गायी चोरल्या जात आहेत. यासाठी दिवसा हेरगिरी करून, रात्री चारचाकी गाडीत मोठ्या शिताफीने गायी भरून पळविल्या जात आहे. यासाठी चोरट्यांनी गर्भवती गायींना लक्ष केले असून, एकाच गोठ्यात बांधलेल्या पाच गायींपैकी केवळ गर्भवती गाय हेरून चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
हेही वाचा - निराधार व अंध असूनही मिळविले हे यश... वाचा ही प्रेरणादायी कहाणी
गुरांच्या मालकांकडून तक्रार नाही
गुरे चोरीला गेल्यानंतर जनावरांचे मालक बहुतेक वेळा तक्रार करीत नाहीत. तक्रार करण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसरात गुरांचा शोध घेण्यावर त्यांचा अधिक भर असतो. आज ना उद्या भरकटलेली गुरे सापडतील या आशेवर ते शोध घेत सर्वत्र हिंडतात. याच संधीचा चोरटे फायदा घेत आहेत. गुरांची चोरी करण्यासाठी सुरू असलेला नवा हायटेक प्रकार नागपूरात राबविला जात आहे. यापूर्वी गुरांची हाकलत पळवून नेली जात असे. आता मात्र सरळ चारचाकी वाहनात गुरे कोंबून नेली जात आहेत.
क्लिक करा - Video : साठ वर्षे शेतात राबला हा पोशिंदा, आता झाला सेवानिवृत्त
माझ्याकडे पाच जर्सी गायी आहेत. परिसरात गायींची चोरी होत असल्याच्या घटना कानावर येत असल्याने, मी आपल्या गोठ्यात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. 15 डिसेंबरला रात्री साडेतीनला दोन चोर माझ्या गोठ्यातील गर्भवती गायीला गाडीत टाकून नेतांना दिसत आहे. गायीची किमंत सुमारे 50 हजार रूपये होती. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे.
- दिनेश तुकाराम भांगे