
प्रदीप ढोबळे (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मारुती झेन एमएच २९, एन ६१५ या वाहनात देशी दारूच्या एकूण ११ पेट्या आणल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती.
तिवसा (जि. अमरावती) : प्रजासत्ताकदिनी तिवसा शहरात अवैधपणे दारूची वाहतूक मारुती सुझुकी झेन वाहणाद्वारे करण्यात येत होती. शापामोहन सभागृहाजवळ दारूच्या पेट्या व वाहन आरोपीसह जप्तीची कारवाई तिवसा पोलिसांनी केली.
प्रजासत्ताकदिनी दारूबंदी असताना येथील शिक्षक कॉलनी परिसरात अवैध देशी दारूवर तिवसा पोलिसांनी धाड टाकून दारूच्या ११ पेट्यांसह झेन गाडी असा एकूण एक लाख एक हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रदीप ढोबळे (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मारुती झेन एमएच २९, एन ६१५ या वाहनात देशी दारूच्या एकूण ११ पेट्या आणल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे पोलिस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के, पोकॉ अरविंद गावंडे, रोहित मिश्रा, रोशन नंदरधने, राजेंद्र चव्हाण, नरसिंग राठोड यांनी सकाळी १० वाजता धाड टाकून तेथून ३१,७४० रुपये किमतीची दारू व ७० हजार रुपयांची गाडी असा एकूण एक लाख एक हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.