राजनांदगावात झडती घेतलेल्या त्या पिकअप वाहनात भाजीपाल्याऐवजी पोलिसांना सापडले...

truck
truck

कोरची (गडचिरोली) : प्रतिबंधित वस्तुंची चोरटी वाहतुक पोलिसांसाठी नेहमीच आव्हान असते. जीवनावश्‍यक वस्तुंचा परवाना काढून तंबाखू किंवा तत्सम वस्तूंची वाहतुक राजरोसपणे सुरू असते. अशीच घटना रांजनांदगाव येथे घडली. पोलिसांना माहिती मिळताच भाजीपाल्याच्या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू असल्याचे आढळून आले.

जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीचा परवाना काढून भाजीपाल्याच्या वाहनातून चक्क सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे. कोरची पोलिसांनी अशाच एका वाहनातून 80 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.

देसाईगंज येथील भाजीपाला व्यापारी लकी उर्फ लंकेश हटनागर हा आपल्या एम.एच.36-एए399 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून राजनांदगाव येथून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. लागलीच कोरची पोलिसांनी सायंकाळी नाकेबंदी करून वाहन अडविले. यावेळी वाहनात 80 हजार रुपये किमतीचा "ईगल' व "मजा' नामक सुगंधित तंबाखू जप्त केला. शिवाय 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेतले.

उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक कोंडूभैरी, श्रीमंगल यांच्यासह शिपाई निशांत व सचिन यांनी ही कारवाई केली. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. याप्रकरणी वाहनधारकाची कसून चौकशी केली तर सुगंधित तंबाखूचा व्यापार करून मोठी रक्कम कमविणारे अनेक मोठे व्यापारी गळाला लागू शकतात. देसाईगंज व आरमोरी ही दोन शहरे सुगंधित तंबाखूच्या तस्करीची केंद्रे असल्याची चर्चा आहे.

नेमका तंबाखू किती होता?
पोलिसांनी पकडलेल्या वाहनात 8 पोते सुगंधित तंबाखू होता. परंतु तो केवळ 3 पोत्यात भरून कारवाई करण्यात आली, अशी चर्चा आहे. 8 पोत्यांतील तंबाखूची किमत बाजारभावानुसार 3 लाख 84 हजार रुपये एवढी होते. मात्र, तीनच पोते तंबाखू दाखविल्याने ही किंमत 80 हजारांवर आली, असे सांगितले जाते. त्यामुळे पोलिसांना नेमका किती तंबाखू आढळला व जप्त किती केला, याविषयी उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com