एक चूक आणि सॉफ्टवेअर अभियंत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; वाचून तुम्हालाही बसेल धक्का  

Software engineer misbehaved with a girl in Amravati
Software engineer misbehaved with a girl in Amravati

अमरावती ः अमरावतीच्या एका युवतीने सॉफ्टवेअर अभियंत्याचा क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्याने तिच्या नातेवाइकांना सोशल मीडियावरून दोघांमध्ये झालेले चॅटिंग शेअर करून बदनामी केली. याप्रकरणी पुणे येथील अभियंत्यास सायबर पोलिसांनी अटक केली.

संशयित आरोपी अमित विलास टेंभूर्णे (रा. नागपूर) सॉफ्टवेअर अभियंता म्हणून पुणे येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. असे सायबर पोलिसांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी त्याची अमरावतीच्या एका युवतीसोबत सोशल मीडियावरून ओळख झाली. बरेच दिवसांपर्यंत त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू होती. एकमेकांना मॅसेज पाठविले. परंतु युवतीचे कुणासोबत तरी चॅटिंग सुरू असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली. कुटुंबीयांनी तिची समजूत काढली. त्यामुळे युवतीने अमितचा क्रमांक ब्लॉक केला. 

त्याच्यासोबत चॅटिंगसुद्धा बंद केले. परंतु तिने अचानक नंबर ब्लॉक करून संपर्क टाळल्याने अमित चिडला. त्याने युवतीच्या काही जवळच्या नातेवाइकांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून नंबर मिळविले. त्यांच्या नंबरवर त्या दोघांमध्ये झालेल्या चॅटिंगचे काही मॅसेज फॉरवर्ड केले. युवतीला तिच्या नातेवाइकांकडून या गैरप्रकाराची माहिती मिळाली. त्यामुळे पीडितेने आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सायबर पोलिसांचे एक पथक पुण्यात जाऊन आले. सॉफ्टवेअर अभियंत्यास पकडून अमरावतीत आणले. त्याला रविवारी (ता. 21) विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस विनयभंग व आयटी ऍक्‍टचा गुन्हा दाखल असलेल्या युवकापर्यंत पोहचू शकले.
-रवींद्र सहारे, 
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com