बहाद्दर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी लढविली शक्कल, वाहने बाहेर पार्क करून पायीच गाठले कार्यालय

कृष्णा लोखंडे
Wednesday, 18 November 2020

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकलने यावे, असे आवाहन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे. त्यानुसार आयुक्तांसह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी व कर्मचारी सायकलने आलेत. मात्र, काही बहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्याय शोधून काढत राजकमल चौकापर्यंत वाहनांनी प्रवास करीत ती वाहने महापालिका परिसराबाहेर पार्क केली व पायी कार्यालय गाठले.

अमरावती : माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना दर बुधवारी सायकलने कार्यालयात येण्याची सूचना आहे. काही बहाद्दर अधिकारी व कर्मचारी मात्र वाहनांनीच येत असून त्यांनी वाहने महापालिकेबाहेर पार्क करून पायी कार्यालय गाठल्याचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा - बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे...

प्रदूषणमुक्तीसाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत दर बुधवारी महापालिकेत वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकलने यावे, असे आवाहन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे. त्यानुसार आयुक्तांसह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी व कर्मचारी सायकलने आलेत. मात्र, काही बहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्याय शोधून काढत राजकमल चौकापर्यंत वाहनांनी प्रवास करीत ती वाहने महापालिका परिसराबाहेर पार्क केली व पायी कार्यालय गाठले.

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्यांदाच २७ उमेदवार रिंगणात, कोविडच्या पार्श्वभूमीवर...

अनेकांना सायकलने येणे अशक्‍य आहे. काही कर्मचारी बडनेरा येथून येतात. त्यांना सायकलने येणे शक्‍य होत नसल्याने वाहनांचा आधार घ्यावा लागतो, तर काहींजवळ सायकल नाही. खुद्द उपायुक्त सुरेश पाटील यांच्याकडे सायकल नसून ते दर बुधवारी भाड्याने सायकल घेतात. माझी वसुंधरा अभियानात सायकलनेच यावे, अशी सक्ती नाही. स्वेच्छा महत्त्वाची आहे, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. ते म्हणाले काही कर्मचाऱ्यांना अडचणी असू शकतात, त्या समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: some officers and executive violate rule of cycling in amravati municipal corporation

Tags
टॉपिकस
Topic Tags: