ब्रेकिंग: नागपूरहून वरुडकडे येणारी बस पुलावरून कोसळली; २० जण गंभीर जखमी असल्याची माहिती 

टीम ई सकाळ 
Sunday, 17 January 2021

नागपूरवरून वरुडकडे येणाऱ्या काटोल जी नागपूर डेपोच्या एम एच 40 एक्यू 6056  या बसला ढगा या गावाजवळ अपघात झाला. वरुड कडून येणाऱ्या क्र एम एच 27यु 1125 या क्रमांकच्या  ट्रॅक्टर ला नागपूर वरून वरुड कडे येणाऱ्या एस टी बसने ढगा येथील नदीच्या पुलावर जोरदार धडक दिली. 

वरुड (जि. अमरावती) : एसटी बस आणि  ट्रॅक्टरच्या अपघातात नागपूर वरून वरुडकडे येणारी बस पुलाखाली कोसळल्याची घटना 7.30 सुमारास घडली या अपघातात बसमधील 20 प्रवाशी  जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र अन् घडली जीव जाळून टाकणारी घटना 

नागपूरवरून वरुड कडे येणाऱ्या काटोल जी नागपूर डेपोच्या एम एच 40 एक्यू 6056  या बसला ढगा या गावाजवळ अपघात झाला. वरुड कडून येणाऱ्या क्र एम एच 27यु 1125 या क्रमांकच्या  ट्रॅक्टर ला नागपूर वरून वरुड कडे येणाऱ्या एस टी बसने ढगा येथील नदीच्या पुलावर जोरदार धडक दिली. 

धडकनंतर ही बस पुला खाली कोसळली.या घटनेत बसमधील प्रवाशी जखमी झाले.या अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांची संख्या अंदाजे २० च्या जवळपास असल्याची प्राथमिक महिती आहे वृत्तलिहिस्तोवर जखमींना  ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते.

जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

अपघाताची माहिती समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषींकेश राऊत, गणेश चौधरी,, प्रभाकर काळे, यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळताच आमदार देवेंद्र भुयार यांनी घटनाष्टळाकडे धाव घेतली

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus Fall down from bridge in Accident near Varud Amaravati