esakal | महामंडळाच्या बसगाड्यांना लागली गळती! अडचणींमुळे प्रवासी त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

महामंडळाच्या बसगाड्यांना लागली गळती! अडचणींमुळे प्रवासी त्रस्त

पावसाळ्यात या गळक्या बसगाड्यांमध्ये रात्र जागून काढण्याची वेळ बसवाहक व चालकांवर आलेली आहे.

महामंडळाच्या बसगाड्यांना लागली गळती! अडचणींमुळे प्रवासी त्रस्त

sakal_logo
By
चेतन देशमुख- सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ: जिल्ह्याच्या आगारातून रात्रीच्या मुक्कामासाठी ग्रामीण भागात अनेक बसगाड्या जातात. परंतु, एकाही ठिकाणी त्यांच्यासाठी मुक्कामाची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात बसगाड्यांना गळती लागत असल्याने प्रवासी त्रस्त असतानाच आता बसचालक-वाहकांनादेखील त्याचा त्रास करावा लागत आहे. पावसाळ्यात या गळक्या बसगाड्यांमध्ये रात्र जागून काढण्याची वेळ बसवाहक व चालकांवर आलेली आहे.(ST corporation buses have started leaking)

हेही वाचा: बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी उद्या बंद

ग्रामीण भागातील प्रवाशांना सेवा देणारी जीवनवाहिनी म्हणून एसटी बसची ओळख आहे. परंतु, आता याच जीवनवाहिनीची ओळख बदलताना दिसून येत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे आहे त्याच बसगाड्यांची डागडुजी करून बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये कुठलेही तक्रार न करता बसचालक व वाहक अविरत व नियमित सेवा देत आहेत. उन्हाळा व हिवाळ्याच्या दिवसांत फारसा त्रास होत नाही. मात्र, पावसाळ्यात चालक-वाहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: यवतमाळ : बस-ट्रकच्या धडकेत 16 प्रवासी जखमी, दोन गंभीर

पावसाळा सुरू झाल्यास तात्पुरती डागडुजी करून बसगाड्या धावत असल्या तरी जास्त पावसात बसमध्ये छत्री किंवा रेनकोट घालण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अंदाजे 500 लालपरी बसगाड्या आहेत. त्यामधील बहुतांश बसमधून गळती होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या रोषाचा सामना चालक व वाहकांना करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला की, भंगार व गळक्या बसगाड्यांमध्ये पाऊस सुरू असला, तर चालक-वाहकांना संपूर्ण रात्र जागूनच काढावी लागत आहे.

हेही वाचा: यवतमाळ : ओबीसी आरक्षणावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

सुविधांबाबत पुढाकार घेण्याची गरज

ग्रामीण भागात मुक्काच्या ठिकाणी पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध होत नाही. अस्वच्छ बसमध्ये जेवणामुळे चालक व वाहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. बर्‍याच मुक्कामाच्या ठिकाणी गावाच्या बाहेर बस उभी ठेवावी लागत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. शौचास उघड्यावर जावे लागत असल्याने शासनाच्या हागणदारीमुक्त गावाच्या उपक्रमाला एसटी प्रशासनाकडूनच ‘खो’ दिला जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून 2017 रोजी सर्व विभागांना सूचना प्रसारित केलेल्या आहेत. रात्री मुक्कामाला जाणार्‍या बसगाड्यांच्या चालक व वाहकांसाठी राहण्याची, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आगार व्यवस्थापकांनी रात्री मुक्कामाला जाणार्‍या गावांना भेटी देऊन सरपंचांशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार करावा. परंतु, तसे होताना दिसत नाही.

loading image