कांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया

Strange advice from Minister of State Bacchu Kadu on onion price hike
Strange advice from Minister of State Bacchu Kadu on onion price hike

अमरावती : देशात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, कांदासह जवळजवळ सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात कांदाचे चांगलेच भाव वाढले आहेत. कांद्याचा भाव वाढल्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सर्वसामान्यांकडून भाववाढीवर ओरड होत असताना राज्याचे कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कांदा परवडत नसेल तर लसूण व मुळा खा, असा सल्ला दिला आहे.

सध्या कांद्याने प्रतिकिलो सत्तरी गाठली असून, सामान्यांनी या भाववाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. यंदा अतिवृष्टीने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने व परदेशातून कांदा न आल्याने टंचाई निर्माण झाली आहे. साठेबाजांनी कांदा चाळीतील कांदा बाजारात आणून भाववाढ केली आहे. कांद्याच्या भाववाढीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी कांद्याचे भाव आणखी वाढायला हवेत, असे मत व्यक्त करतानाच नव्या कांद्याला भाव अधिक मिळाल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. ‘कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’ असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. कांद्याच्या भाववाढीला सामान्यांना सामोरे जावे लागत असताना राज्यमंत्र्याच्या या सल्ल्यावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अमरावती येथे बोलताना बच्चू कडू यांनी कांद्याच्या वाढत्या किंमतींवर भाष्य केले.

लवकरच कांदा शंभरी गाठेल

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाली आहे. कांद्याच्या पिकालाही फटका बसला आहे. त्यामुळे सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने ७०-९० रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो ५० ते ७० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

देशात कांद्याचा तुटवडा

गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले आहे. आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून, अतिवृष्टामुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब लागेल. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com