त्याची एका मुलीशी झाली मैत्री..पण त्यांनी घरी पाठवले पोलिस..अन विद्यार्थ्याने उचलले धक्कादायक पाऊल

अमर घटारे
Saturday, 8 August 2020

मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पळसखेड येथील अनिल नारायण जगनाडे मुलांच्या शिक्षणासाठी अमरावती येथे राहतात. त्यांचा मुलगा अनुराग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकत होता.

पळसखेड (जि. अमरावती) : तालुक्‍यातील पळसखेड येथील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या अनुराग अनिल जगनाडे (वय १९) याच्या आत्महत्येप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्राचार्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पळसखेड येथील अनिल नारायण जगनाडे मुलांच्या शिक्षणासाठी अमरावती येथे राहतात. त्यांचा मुलगा अनुराग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकत होता. त्याची एका मुलीशी मैत्री झाली.

त्यावरून संबंधित प्राचार्य अनुरागच्या अमरावती येथील घरी दोन-तीन वेळा गेले व त्यांनी अनुरागसह त्यांच्या कुटुंबीयांना दमदाटी केल्याचा आरोप पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते पोलिसांना घेऊन अनुरागच्या घरी आले होते.

उघडून तर बघा - जो खाईल तूप त्याला येईल रूप... वाचा तूप खाण्याचे फायदे

अशातच कोरोना लॉकडाउनच्या काळात कॉलेजला सुटी असल्याने अनुराग १५ दिवसांपूर्वी पळसखेड येथे आला होता. दोन ऑगस्टला दुपारी अनुरागची तब्येत अचानक बिघडल्याचे व त्याला अमरावती येथे आणत असल्याचा फोन आला. आम्ही इर्विन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्याने रक्तवाहिनीमधून विषारी औषध घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

त्याचे शवविच्छेदन करून पळसखेड येथे आलो व घरात गेलो असता टीव्हीजवळ कुलरवर अनुरागची इंग्रजीमधील सुसाईड नोट दिसली. त्यात तिघे मानसिक छळ करीत असल्याचे लिहिले आहे. माझ्या मुलाला प्राचार्यांसह तिघांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची लेखी तक्रार मृताचे वडील अनिल जगनाडे यांनी दिली.

आईचा वाढदिवस घरी आनंदाचे वातावरण अन तेवढ्यात आली दुःखद वार्ता..साठे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर..वाचा सविस्तर

लेखी तक्रार व शवविच्छेदनाच्या अहवालावरून चांदूररेल्वे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्राचार्यांना शनिवारी वर्धा येथून अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे, पीएसआय राहुल चौधरी, गणेश मुपडे, श्रीकृष्ण शिरसाट, शेख गनी यांनी केली.
 

संपदान - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student took extreme as his teacher send police to his house