esakal | आईचा वाढदिवस घरी आनंदाचे वातावरण अन तेवढ्यात आली दुःखद वार्ता..साठे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर..वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

home minister anil deshmukh visited pilot deepak sathes home in nagpur

दुबईहून केरळमधील कोझीकोड येथे आलेले एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा धावपट्टीवर उतरत असताना अपघात झाला. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. त्यात मुख्य वैमानिक असलेले दीपक साठे यांचा मृत्यू झाला.

आईचा वाढदिवस घरी आनंदाचे वातावरण अन तेवढ्यात आली दुःखद वार्ता..साठे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर..वाचा सविस्तर

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर: कोझिकोड येथे शुक्रवारी रात्री झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र व वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी वैमानीक दीपक यांचे वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक उपस्थित होते.

दुबईहून केरळमधील कोझीकोड येथे आलेले एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा धावपट्टीवर उतरत असताना अपघात झाला. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. त्यात मुख्य वैमानिक असलेले दीपक साठे यांचा मृत्यू झाला. विमान उतरविण्यापूर्वी त्यांनी आकाशात विमानाच्या दोन घिरट्या घातल्या त्यानंतर विमान धावपट्टीवर उतरविले. मात्र त्यात दीपक साठे यांना प्राण गमवावे लागले.

हेही वाचा- बापरे! - विश्वासाला तडा... प्रियकराच्या मदतीने पत्नी करत होती पतीचा खून अन् पाच वर्षांचा मुलगा उघड्या डोळ्याने बघत होता

कोण होते दीपक वसंत साठे 

दीपक साठे यांनी एनडीएचा ५८ वा कोर्स अव्वल क्रमांकाने पूर्ण केला होता. भारतीय वायूसेनेत सेवा दिल्यानंतर ते एअर इंडियामध्ये दाखल झाले होते. दीपक साठे हे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि 'राष्ट्रपती पदका'ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, बहीण अंजली साठे-पराशर, मुलगा धनंजय, शांतनू, स्नुषा वैभवी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. 

नक्की वाचा - ती ढसा ढसा रडत होती; कारण, सर्व मागण्या पूर्ण केल्यावरही त्याने बोहल्यावर चढण्यास दिला नकार

वाढदिवशीच मिळाली वार्ता 

एअर इंडियाचे वैमानिक दीपक वसंत साठे यांचे शुक्रवारी झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्या मातोश्रींचा शनिवारी वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशीच मुलाबद्दलची अशी दुःखद बातमी ऐकून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ