विद्यार्थ्यांची घालमेल, पालक संभ्रमात; शाळा आणि शिकवणी वर्गासमोर समस्यांचा डोंगर

सुरेंद्र चापोरकर 
Thursday, 21 January 2021

शाळा सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांमधील अंतर राखण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करणे तसेच एका वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजीदेखील घेतल्या जात आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याची उत्सुकता असली तरी दुसरीकडे आतून भीतीदेखील आहे.

अमरावती ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या शैक्षणिक सत्रात शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गाच्या दोन ते तीन महिन्यांसाठी शाळा सुरू झाल्या तरी खरोखरच किती अभ्यासक्रम पूर्ण होणार? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे, त्यासाठी शाळांमध्ये त्या पद्धतीची व्यवस्थासुद्धा करण्यात येत आहे.

शाळा सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांमधील अंतर राखण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करणे तसेच एका वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजीदेखील घेतल्या जात आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याची उत्सुकता असली तरी दुसरीकडे आतून भीतीदेखील आहे. कारण कोरोनाचे संकट पाहिजे त्या पद्धतीने अद्यापही दूर झालेले नाही. शाळा सुरू झाल्यावर एखाद्या विद्यार्थ्याला लागण झाली व शाळेच्या नावाने बोंब सुरू झाली तर काय? असा प्रश्‍न काही शाळा व्यवस्थापनाला सतावत आहे. खासगीत ते यासंदर्भातील भीतीसुद्धा व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - अख्खं गाव हळहळलं! पत्नीवर अंत्यसंस्कार झाले अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही सोडला जीव

विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आता शाळेत जाण्यासाठी कंटाळ येत आहे. वार्षिक परीक्षेला आता केवळ दोन ते तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पार फज्जा उडालेला आहे. आधीच्या धड्यांवर आधारित झालेली परीक्षासुद्धा विद्यार्थ्यांनी लाइटलीच घेतली. आता शाळा सुरू झाली तरी एक दिवसाआड वर्ग होतील. त्यामुळे किती कोर्स पूर्ण होईल व त्यावर आधारित परीक्षा कशी राहील आदी प्रश्‍न अनुत्तरित आहेत.

शिक्षण होईल काय?

शाळा सुरू झाल्या तरी त्या एक दिवसाआड राहणार आहेत. दिवसाला केवळ तीन तास होतील, त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होणे अशक्‍यच आहे. त्यातच पालकांचे संमतिपत्र आवश्‍यक असल्याने किती पालक ते देतील हा प्रश्‍न आहेच.

नक्की वाचा - भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

शैक्षणिक नुकसानाचे वर्ष

यंदाचे हे वर्ष कोरोनामुळे शैक्षणिक दृष्टीने नुकसानाचे ठरले आहे. माझा मुलगा दहाव्या वर्गात आहे. पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने बेस पक्का होण्याच्या दृष्टीने त्याची यावर्षी तयारी होणे आवश्‍यक होते, परंतु मार्गदर्शनाच्या अभावात त्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे एका पालकाने सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students and parents are in confusion