रस्त्याची अवस्था अशी; त्रस्त ग्रामस्थांनी गाढवालाच आणले आंदोलनात

dharane andolan
dharane andolan

मूर्तिजापूर (जि.अकोला) : प्रतिक्षा आणि सहनशिलता संपलेल्या तालुक्याच्या 23 गावांमधील
असंख्य ग्रामस्थांनी आसरा रस्त्यावर दहा निवडक ठिकाणी पार दूर्दशा झालेल्या
रस्त्यांच्या नवनिर्माणाच्या मागणीसाठी सोमवारी (ता.24) दिवसभर धरणे
आंदोलन केले.

अधिकारी नसतात आपल्या कार्यालयात
रस्त्याच्या नावे आलेला निधी, पॕचेसच्या नावाखाली जिरविण्यात माहीर असलेले
अधिकारी निविदा काढत आहेत. रस्त्यांच्यी विविध ठिकाणी खड्ड्यामुळे पार
चाळण्या झाल्या आहेत. दयनीय अवस्थेतील ग्रामीण रस्त्यांवर रोज छोटे-मोठे
अपघात होण्याच्या घटना घटत आहेत. या अपघातात कोणाचे प्राण गेले तर
कोणाला कायमचे अपगंत्व आले. बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी
कार्यालयात कधीच आढळत नाहीत. आणि लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी
स्विकायला तयार नाहीत.

प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी
अशा तक्रारींसह आपापल्या गावांचा फलक हाती घेऊन सुमारे २3 गावांमधील
सरपंच, विद्यार्थी, ग्रामस्थांनी आपल्या गावाजवळील आंदोलनस्थळी धरणे
आंदोलनात सहभाग घेतला व तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सकाळी दहा
वाजल्यापासूनच आंदोलनकर्त्यांनी आपापल्या गावाजवळचे आंदोलनस्थळ गाठले.
प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. आता तरी डोळ्यावर कातडे ओढून
बसलेल्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील काय? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी
उपस्थित केला. पंचायत समिती सभापती उर्मिलाताई डाबेराव, उपसभापती सुभाष
राऊत, बबानराव डाबेराव, अशोक दूबे, बंडूभाऊ डाखोरे, सागर कोरडे, किशोर
नाईक, मुरलीधर मुघल, बाजड, रोहीत सोळंके, किशोर सोनोने, मोहंमद शहाबुद्दीन
यांनी आंदोलनाचे नियोजन केले.

दहा आंदोलनस्थळे; 23 गावे!
हिरपूर, ब्रम्ही, शिरताळा, बोर्टा, हिवरा कोरडे, सोनोरी, बपोरी, रोहणा, शेलू बाजार
अशा दहा ठिकाणी आंदोलनस्थळे निश्चित करण्यात आली होती. जितापूर,
टिपटाळा, सांजापूर, साखरी, लंघापूर, बोर्टा, खापरवाडा, लोणासणा, पोही, खोळद,
मांदुरा, एंडली, पिंगळा या 13 गावांसह दहा आंदोलनस्थळे अशा 23 गावांमधील
सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, विद्यार्थी व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले
होते.

‘शहाण्यांनो चालण्यास रस्ता द्या’
हिरपूरच्या आंदोलनस्थळी श्री गुरुदेव चंदनशेष भजन मंडळाने आपल्या
भजनांमधून आजच्या विदारक स्थितीवर भाष्य केले. ममता गावंडे या ग्रामीण
भागातील महिलेने सादर केलेले भजन विशेष आकर्षण ठरले. ज्येष्ठ काँग्रेस नेते
बबनराव डाबेराव यांनी या आंदोलनस्थळी कान धरून आणलेले व गळ्यात
'शहाण्यांनो चालण्यास रस्ता द्या', असा फलक अडकविलेले गाढव रस्त्यांच्या
दूर्दशेचे गांभीर्य अधोरेखीत करणारे ठरले.

गुन्हे दाखल झाले तरी चालतील
रस्त्याच्या नावे आलेला निधी, पॕचवर्कच्या नावाखाली अधिकारी जिरवतात. आता
पॕचवर्कचा प्रयत्न हाणून पाडणार. गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही.
पॕचवर्कसाठी आणल्या जाणारी बांधकाम सामग्री आम्ही लंपास करू.
-बबनराव डाबेराव, ज्येष्ठ काँग्रेस नेते.

अनेक कामे प्रस्तावित आहेत

आंदोलनस्थळांना भेट दिली, बबनराव डाबेरावांशी बोललो. मागण्या ऐकून व
समजून घेतल्या. रोहणा-हिरपूर 15 किमी रस्ता राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित
आहे. आसरा-लाखपुरी-म्हैसांग मंजूर आहे. पुढील महिन्यात निविदा निघतील.
राष्ट्रीय महामार्गाच्या तोडीचा हा रस्ता होईल. रोहणा-गौरखेडी पर्यंतच्या 30 किमी
रस्त्याचे पॕचवर्क मंजूर आहे, त्यात 52 गेट पासून हायवे पर्यंतचा भाग वगळला.
पण आंदोलनकर्त्यांना नको असल्यामुळे थांबविणार, डांबरीकरण अर्थसंकल्पात
प्रस्तावित आहे.
-उमेश वानखडे, उपविभागीय आभियंता, सा.बां. उपविभाग, मूर्तिजापूर.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com