esakal | दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नेर-वडकी (जि. यवतमाळ) : कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर व राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गुरुवारी (ता. दोन) घडली. शेतकरी आत्महत्यांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यादे राजधानी राठोड (वय २०, रा. अशोकनगर, नेर) व विशाल भाऊराव खोंडे (वय ३५, रा. वडकी) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

नेर येथे शेतकरी यादे राठोड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यादे राठोड याच्याकडे १६ एकर शेत असून त्याच्यावर स्टेट बँकेचे एक लाख दहा हजार रुपये व सोसायटीचे ५१ हजार असे एकूण एक लाख ६१ हजाराचे कर्ज आहे. नेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नवनीत राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात?

वडकी येथे गळफास घेऊन विशाल खोंडे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. विशालची पत्नी माहेरी गेली आहे. तर आई भांडे घासत होती. गुरुवारी सकाळी पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यामागे आई, पत्नी व लहान मुलगा असा आप्तपरिवार आहे. शेतीमध्ये सततची नापिकी व उदरनिर्वाहाच्या चिंतेतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

loading image
go to top