शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांचा विषय राजकारणातून कायमचा संपणार - सुनील केदार

सुरेंद्र रामटेके
Monday, 30 November 2020

गांधीजींच्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या सर्वसेवा संघाचे दोन दिवसांचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात चंदन पाल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्व सेवा संघाच्या सदस्यांशी चर्चा करण्याकरिता मंत्री केदार आले होते.

वर्धा : भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्यांना देशवासीयांनी धडा शिकवलेला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना अडवण्यात आले. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यांची विचारधारा दाबण्यात आली. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा नायनाट होणार आहे. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांचा विषय राजकारणातून आणि समाजकारणातून कायमचा संपणार आहे, अशी टीका राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आज यांनी केली.  ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सर्व सेवा संघाचे दोन दिवसीय अधिवेशन आज पार पडले. यावेळी येथे आले होते. मंत्री केदार म्हणाले, आजचं अधिवेशन हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्या देशाच्या सामान्य माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये स्वाभिमानी राहण्याची आणि लढण्याची जी प्रेरणा दिली होती. आपले विचार पक्के करा, असे जे सांगितले. याची परिपूर्ती करणारी आहे. विशेष म्हणजे तशी कृती येथील लोकांनी विशेषतः अविनाश काकडे यांनी करून दाखवली, हे विसरता येणार नाही. पदवीधर निवडणुकीचा विषय महात्मा गांधींच्या परिसरामध्ये सांगणे योग्य होणार नाही. कारण येथे एकमताचा विचार असतो, निवडणुकीचा नाही. त्यामुळे हा विषय मी या परिसरातून बाहेर पडल्यानंतरच सांगू शकेल. 

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....

गांधीजींच्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या सर्वसेवा संघाचे दोन दिवसांचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात चंदन पाल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्व सेवा संघाच्या सदस्यांशी चर्चा करण्याकरिता मंत्री केदार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिवेशनात विविध राज्यांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil kedar criticized bjp on farmer protest issue in wardha