वसतिगृहात व्यायाम करताना मुलीचा झाला अपघात अन् कुटुंबीयांनी उचलले हे पाऊल...

Suspected death of student at Government Hostel in Yavatmal
Suspected death of student at Government Hostel in Yavatmal
Updated on

महागाव (जि. यवतमाळ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलींच्या निवासी शाळेतील शुक्रवारी (ता. 13) सकाळी विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. तिच्या गळाभोवती आवळल्याच्या खुणा आहेत. तसेच हातावर जखमा आहेत. यामुळे शिवानीच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवानी देवराव वाघमारे (वय 13) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शिवानीची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. आई-वडील मजुरी करतात. महागाव शहराला लागूनच असलेल्या कलगाव येथील ती रहिवाशी होती. मागील वर्षीच शिवानीला शासकीय निवासी शाळेत प्रवेश मिळाला होता. तेव्हापासून ती मुलींच्या निवासी शाळेतच (वसतिगृह) राहत होती. ती इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. 

शुक्रवारी सकाळी लोखंडी बारवर व्यायाम करीत असतना शिवानीचा अपघात झाला. यानंतर शिवानीला सवना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. सवना रुग्णालयात फॉरेंसिक लॅब व महिला डॉक्‍टर नसल्यामुळे शिवानीचा मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी पुसद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. 

शिवानीच्या मृतदेहाची इन कॅमेरा उत्तरीयतपासणी करण्यात आली. निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला भोयर आणि शिवानी सोबत शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे बयान पोलिसांनी नोंदविले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर शिवानीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे डॉक्‍टरांनी सांगितले. 

गळ्यावर आवळल्याच्या खुणा

शुक्रवारी सकाळी निवासी शाळेच्या आवारातील लोखंडी बारवर शिवानी व्यायाम करीत असताना कोसळली. यातच तिच्या मृत्यू झाल्याचे शाळेकडून सांगितले जात आहे. लोखंडी बारवरून कोसळल्याचे स्पष्टीकरण निवासी शाळेकडून आले असले तरी शिवानीच्या शरीरावर कुठलीही गंभीर जखम नाही. उलट तिच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आहेत. तसेच हातावर जखमा आहेत. यामुळे शिवानीच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

शिवानीचा मृत्यू खेळताना झाल्याचे स्पष्टीकरण निवासी शाळेकडून देण्यात आले आहेत. याउलट शिवानीच्या गळ्यावर आणि हातावर जखमा असल्याने तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. यामुळे शिवानीचा मृत्यू आपघातामुळे झाला की यामागे घातपात आहे याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 

मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा 
गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिवानी वाघमारे हिचा शासकीय निवासी शाळेत झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करावी. 
- राजेंद्र नजरधने, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com