यवतमाळमध्ये एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पाच कर्मचारी रडारवर, निलंबनाची टांगती तलवार कायम

suspension action may happen on one api with five employees in yavatmal
suspension action may happen on one api with five employees in yavatmal

यवतमाळ : पोलिस दलाला शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी उगारला आहे. एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, पाच पोलिस कर्मचारी निलंबनाच्या रडावर असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी (ता.27)पोलिस मुख्यालयातील बैठकीत दिली.

पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षकांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्यासाठी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, तपास अधिकारी यांना पाचारण करण्यात आले होते. दुपारपासून सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. यावेळी उपविभागनिहाय प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. एक वर्षापेक्षा प्रलंबित गुन्ह्यांची संख्या अधिक असल्याचे बघून पोलिस अधीक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात यावा, अन्यथा कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना निलंबित करण्यात येईल. एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, पाच कर्मचाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अवधूतवाडीत -
फळविक्रेत्याला खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेऊन अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील कर्मचाऱ्याने मारहाण केली. संशयिताने आपबीती न्यायालयापुढे सांगितली. त्यामुळे 'त्या' पोलिस कर्मचाऱ्याच्या अडचणीत वाढ झाली. अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी शुक्रवारी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात धडक देत माहिती जाणून घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com