
आईंच्या अशा विशेष कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी अकोला आणि विदर्भातील काही कलावंत एकत्र आले आणि त्यांनी लॉकडाउन आणि आई हा गीत, संगीत व कवितांचा सुंदर असा कार्यक्रम सर्व मातृवर्गाला समर्पित केला.
अकोला : मातृदिनानिमित्त विदर्भातील एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आलो आहोत खास आपल्यासारख्या सहृदय रसिकांसाठी...आपणास बघतांना वाटेल की हा कार्यक्रम एकाच मंचावर सादर झाला आहे...नाही हं! लॉकडाऊनच्या या अवघड परिस्थितीत सगळ्या कलावंतांनी आपापल्या घरी बसून हा कार्यक्रम सादर केला.
हा मनोरंजनाचा खजिना आपल्यापर्यंत पोहचविण्याचं श्रेय आहे वल्लभ नारे या गुणी कलावंताला या कार्यक्रमाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यानेच केले आहे. लॉकडाउनच्या काळात घराघरात आई खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. आईंच्या अशा विशेष कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी अकोला आणि विदर्भातील काही कलावंत एकत्र आले आणि त्यांनी लॉकडाउन आणि आई हा गीत, संगीत व कवितांचा सुंदर असा कार्यक्रम सर्व मातृवर्गाला समर्पित केला.
हेही वाचा - अरे हे काय! परप्रांतिय कामगारांची हे पण कारतायेत लुट; असा घडतोय प्रकार
या कार्यक्रमामध्ये अकोल्यातील छोटी स्टेज सिंगर परिणिता बारापात्रे, रुचा जवळकार, स्निग्धा देशमुख, कबीर जानभोर, मही जानभोर, सुप्रसिध्द लेखिका सीमा बक्षी व कार्यक्रमाला गिटारची साथ अॅड. शिवम भोरदक यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण संगीत नियोजन तथ सिंथेसायझरची साथ वल्लभ नारे यांची आहे.
आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आईची महती सांगून प्रत्येकाने आईला आदर दिला पाहिजे असा संदेश या सर्व नवोदित कलावंतांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोरोना काळात सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता देखील प्रकट करण्यात आली आहे.