

tadoba tiger women
esakal
Tiger Project Women Protect : चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ गावाभोवती तब्बल १३ वाघांचा वावर कायम असल्याने गावकऱ्यांमध्ये मानव–वन्यजीव संघर्षाचे संकट सतत डोकावत असते. वाघांच्या भितीने परिसरात सुरु असलेल्या शाळा बंद पडल्या होत्या या शाळा सुरू करण्याचे काम चार महिलांनी केलं आहे. गावातील मुलांनी गमावलेली शाळा आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा धाडसी निर्धार या महिलांनी केल्यांने यांची जोरदार चर्चा होत आहे.