पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकाने दुसऱ्या शिक्षिकेला पाठविले अश्‍लील मॅसेज

The teacher sent an obscene message to another teacher Amravati crime news
The teacher sent an obscene message to another teacher Amravati crime news

अमरावती : पिढी घडविण्याची ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली तेथील शिक्षकाने दुसऱ्या शिक्षिकेला अश्‍लील मॅसेज पाठवून पाठलाग सुरू केला. गाडगेनगर पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आसीफ खान असे संशयित आरोपीचे नाव आहे.

आसीफ हा व्यवसायाने शिक्षक आहे, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. काही दिवसांपासून शिक्षिकेच्या मोबाईलवर अश्‍लील शब्दाचा प्रयोग केलेले काही मॅसेज आसीफ खान याने पाठविले. बऱ्याच दिवसांपासून आसीफ शिक्षिकेचा पाठलाग करीत होता. घटनेसंदर्भात शिक्षिकेने आसीफ यास समज दिल्यानंतरही वर्तणुकीत फरक पडला नाही.

शिक्षिकेने त्रासाला कंटाळून शिक्षकाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. परंतु, त्याने दुसऱ्या क्रमांकावरूनही अश्‍लील मॅसेज पाठविणे सुरूच ठेवल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आसीफ खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आसीफला अटक झाली नसून, तो अद्याप फरार असल्याचे ठाकरे म्हणाले.

युवक म्हणाला सोबत चल
गाडगेनगरहद्दीत युवतीच्या छेडखानीची दुसरीही घटना उघडकीस आली. युवती मैत्रिणीच्या भेटीसाठी जात असताना संशयित आरोपी रहमत खान दिलबर खान पठाण (वय ३८) याने पीडितेला रस्त्यात अडवून सोबत चालण्याचा आग्रह केला. पीडितेने त्याला स्पष्ट नकार दिला असता ‘मी तुझे कांड करतो’, या शब्दात संशयित रहमत खान याने तिला धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी संशयित रहमत खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अटकेची कारवाई
युवतीला सोबत चालण्याचा आग्रह धरणाऱ्या संशयित रहमत खानविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई झाली.
- मनीष ठाकरे,
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com