esakal | शिक्षकांची परत एकदा 'कोविड' परीक्षा; शाळेसाठी प्रशासन सज्ज; काहींची दुसऱ्यांदा टेस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

teachers have to do corona test once again in Amravati

अमरावती जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळेत एकूण 7 हजार 739 शिक्षक आहेत. यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. शाळा तसेच विद्यार्थ्यांशी संबंध येणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

शिक्षकांची परत एकदा 'कोविड' परीक्षा; शाळेसाठी प्रशासन सज्ज; काहींची दुसऱ्यांदा टेस्ट

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाला असून तत्पूर्वी शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत असलेल्या शिक्षकांना त्यावेळी सुद्धा कोरोना चाचणी करावी लागली होती. आता त्यांना परत एकदा चाचणी करावी लागणार आहे.

हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...

अमरावती जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळेत एकूण 7 हजार 739 शिक्षक आहेत. यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. शाळा तसेच विद्यार्थ्यांशी संबंध येणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शिक्षकांची आरटीपीसीआर तसेच रॅपिड ऍन्टीजेन चाचणी करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय शिक्षकांची संख्या

अचलपूर 452, अमरावती 301, अंजनगावसुर्जी 273, भातकुली 168, चांदूरबाजार 325, चिखलदरा 224, चांदूररेल्वे 156, दर्यापूर 274, धामणगावरेल्वे 213, मोर्शी 310, नांदगाव खंडेश्‍वर 198, तिवसा 155, वरूड 391, अमरावती मनपा 1036, एकूण 4 हजार 739.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या...

ज्या शिक्षकांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी कोरोना टेस्ट केली असेल त्यांना सुद्धा पुन्हा ही चाचणी करावी लागेल. कारण नियमानुसार कोविड टेस्टचा कालावधी मर्यादित आहे. ग्रामपंचायत निवेडणुकीला अनेक दिवस झाले आहेत, त्यामुळे आता त्यांना परत टेस्ट करणे अनिवार्य आहे.
- एजाज खान, 
शिक्षणाधिकारी, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image