esakal | चिंताजनक : पुन्हा त्यांच्या डोळ्यात तरळताय अश्रू; कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी आहे व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

onion farmer.jpeg

महाराष्ट्रामध्ये कांद्याचे दोन हंगामात पीक घेतल्या जाते. यामध्ये नाशिक विभागात पावसाळी कांदा मोठ्या प्रमाणावर लावला जातो.

चिंताजनक : पुन्हा त्यांच्या डोळ्यात तरळताय अश्रू; कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी आहे व्यथा

sakal_logo
By
दत्ता महल्ले

वाशीम : जिल्ह्यात पावसाळी हंगामापेक्षा रब्बी हंगामात कांदा लागवड केली जाते. हा कांदा एप्रिल महिन्यात काढणीस येतो. मात्र, जिल्ह्यात कांदा पक्वतेच्या कालावधीत मार्च, एप्रिल महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस येत राहिला. त्यामुळे पक्व कांदा काढणीस विलंब झाला. परिणामी, जमिनीतील ओलावा, हिरवी पात, कांद्याच्या पुन्हा मुळ्या अंकुरल्या गेल्या. अशी स्थितीतही शेतकऱ्यांना कांदा काढला. मात्र, हा कांदा काढल्यानंतर त्यामध्ये सातत्याने कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा काढणीनंतरच डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

महाराष्ट्रामध्ये कांद्याचे दोन हंगामात पीक घेतल्या जाते. यामध्ये नाशिक विभागात पावसाळी कांदा मोठ्या प्रमाणावर लावला जातो. मात्र, हा कांदा दीर्घकाळ टिकून राहत नाही. मात्र, बाजारपेठेतील कांद्याचा तुटवडा भासू देत नाही. तर पावसाळी कांद्याच्या तुलनेत रब्बी हंगामात लावलेला कांदा उन्हाळी हंगामात काढणीस येतो. रब्बी हंगामातील हा कांदा लागवडीनुसार मार्च, एप्रिल, मे महिन्यात काढणीस येतो. उन्हाळी हंगामातील कांदा चांगल्या दर्जाचा राहत असल्यामुळे तो दीर्घकाळ टिकतो.

आवश्यक वाचा - Video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीला पसंती देतात. मात्र, यंदा परतीचा पाऊस गेल्यानंतरही सातत्याने अकवाळी पाऊस येत राहिला. रब्बी हंगामाल लावलेला कांदा हा मार्च, एप्रिल महिन्यात काढणीस येतो. मात्र, हा कांदा पक्व अवस्थेत असताना सातत्याने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कांद्याची पाल कोमेजण्याऐवजी हिरवीच राहिली. तसेच जमिनीत ओलावा वाढल्यामुळे पक्व कांद्याच्या मुळ्या पुन्हा अंकुरल्या गेल्या. त्यामुळे कांद्यात पाण्याचे प्रमाण वाढले. 

हेही वाचा - अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुद्ध सुरू आहे काम

मात्र, कांदा काढणीची वेळ झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा काढणीस पसंती दिली. मात्र, कापणीनंतर सावलीत ठेवलेला कांदा चाळताना ह्या कांद्यामध्ये कांदे खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे यंदा उत्पादीत केलेला कांदा किमान एक ते दोन महिने टिकती की नाही? अशी चिंता शेतकर्‍यांसमोर उभी राहिली आहे. कांदे खराब होण्याचे प्रमाण असेच सुरू राहिले तर, अल्पावधीत खराब कांदे चांगल्या कांद्यानाही खराब करतील. त्यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

सध्याच्या दराने लागवड खर्चासही महाग
उन्हाळी हंगामातील नवीन कांदा बाजारात येताच दरवर्षी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर गडगडतात. मात्र, दरवर्षी कांदा लागवड करणारे शेतकरी साठवणुकीचे नियोजन करून हा कांदा दीर्घकाळ टिकेल याची खबरदारी घेतात. मात्र, यंदा कांदे खराब होत असल्यामुळे बाजारातील सध्याच्या पडलेल्या दरात कांदा विक्री परवडणारी नाही. या विक्रीतून वाहनभाडे, लागवड खर्च देखील वसूल होणारा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी दिसून येत आहे.

कांद्याचे दर कडाडणार
उन्हाळी हंगामातील कांदा पावसाळ्यात दीर्घकाळ टिकतो. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्याचा फटका कांद्याच्या साठवणुकीवर होणार आहे. ही बाब पाहता बरेच शेतकरी मिळेल त्या दराने कांदा विक्री करण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात यंदा कांद्याच्या दर कडाडणार असल्याचे दिसून येत आहे.

‘हा कांदा दीर्घकाळ टिकणारच नाही’
कांद्याचे पीकच नाशिवंत आहे. त्यातही यंदाच्या हंगामातील कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे हा कांदा दीर्घकाळ टिकाणारा नाही. विक्री करण्यासाठी बाजारपेठाही सुरू नाहीत. असे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे असल्याच्या प्रतिक्रिया कांदा उत्पादकांमधून समोर आल्या आहेत.

का होताहेत कांदे खराब?
दरवर्षी उन्हाळी हंगामात कांद्याचे पाणी तोडल्यानंतर जमीन कोरडी राहते. मात्र, यंदा परतीच्या पावसानंतरही सातत्याने अवकाळी पाऊस येतच राहिला. या पावसामुळे जमीन ओली राहिली. ओल्या जमिनीमुळे कांद्याची पात हिरवी होती. पात हिरवी असल्यास पक्व अवस्थेतील कांद्यास पुन्हा मुळ्यांद्वारे जमिनीतून अन्न शोषले जाते. त्यामुळे कांद्यात पाण्याचे प्रमाण वाढते. या सर्व घटनाक्रमामुळे कांदा दीर्घकाळ टिकत नाही. तर तो अल्पावधीतच खराब होण्यास सुरुवात होते.

जिल्ह्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र (हेक्टर)
वाशीम ...(63 हे.) मालेगाव....(75 हे.)
रिसोड....(80 हे.) मंगरुळपीर .(42 हे.)
मानोरा....(32 हे.) कारंजा .....(48 हे.)
एकूण ..........................340 हेक्टर

loading image