मेळघाटात वर्षभरात पाच बालकांच्या पोटावर चटके; तिघांचा मृत्यू

मेळघाटात वर्षभरात पाच बालकांच्या पोटावर चटके; तिघांचा मृत्यू

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटात (Melghat) अलीकडे बालकांना पोटावर चटके (डम्मा) देण्याचे प्रकार वाढत आहेत. वर्षभरात मेळघाटात पाच बालकांना पोटावर चटके (hit with a hot rod) दिल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पाच प्रकरणांपैकी तीन चिमुकल्यांना जीवही गमवावा लागला आहे. दोन बालकांना जीवनदान देण्यास मात्र आरोग्य विभागाला यश आले आहे. यापैकी दोन घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तरीसुद्धा पोटावर चटके देण्याच्या घटना घडतच आहेत. (The baby was hit with a hot rod in melghat)

मेळघाटात डम्मा देण्याच्या घटना घडतच आहेत. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने जनजागृती तथा कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मेळघाटात आजही आदिवासी कुठल्याही आजारावर सर्वप्रथम घरगुती आणि त्यानंतर गावातीलच भूमका मांत्रिकाकडे उपचार करतात.

मेळघाटात वर्षभरात पाच बालकांच्या पोटावर चटके; तिघांचा मृत्यू
नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम

सध्या मेळघाटात पूर्वीपेक्षा सुशिक्षितांची संख्या वाढू लागल्याने ते प्रमाण कमी झाले असले; तरी काही प्रमाणात सुशिक्षितसुद्धा गरम विळ्याचे चटके शरीरावरील दुखणाऱ्या भागावर घेतात. अशा पद्धतीने उपचार केल्याने पाच बालके अत्यवस्थ स्थितीत पोहोचली होती. त्यापैकी एका बालकाचा मृत्यू ४ जून २०२० रोजी; तर दुसऱ्या बालकाचा २ जुलै २०२० रोजी मृत्यू झाला आहे.

तिसऱ्या बालकाचा मृत्यू नुकताच ६ जून २०२१ ला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना झाला. बोरदा आणि लवादा येथील बालकाला मात्र आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, या पाच पैकी दोन घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक गुन्हा नुकताच ७ जून रोजी दाखल केला आहे. असे असताना मेळघाटात आजही अंधश्रद्धा भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.

(The baby was hit with a hot rod in melghat)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com