गुप्तधनाचा हव्यास; पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न

Attempting to sacrifice a girl
Attempting to sacrifice a girlAttempting to sacrifice a girl

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : गुप्तधनासाठी (The desire for secret money) पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाचे पितळ पोलिस ऐनवेळेवर घटनास्थळी पोहोचल्याने उघडे पडले. ही घटना तालुक्यातील मादणी येथे उघडकीस आली. पोलिसांनी या घटनेत सहभागी मांत्रिकांसह नऊ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर बाभूळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempting to sacrifice a girl)

मादणी येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे बी.फार्मच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या मुलीने याबाबत बाभूळगाव पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. त्यात तिने बापाचे सर्व कारनामे नमूद केले असून नराधम बापाने केवळ बळीच देण्याचा प्रयत्न केला नसून अत्याचार केल्याचेही म्हटले आहे. प्रकृती बरी नसल्याने मुलगी औरंगाबादवरून मादणी येथे वडिलांकडे आली होती. या संधीचा फायदा घेत बापाने गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा डाव रचला. आठ साथीदारांना बोलावून गुप्तधन काढण्यासाठी मंत्रोपचाराची क्रिया सुरू केली.

Attempting to sacrifice a girl
मोदींनी बुधवारी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक; कोरोनावर होऊ शकते महत्त्वाचे निर्णय

दोन्ही मुलींच्या हातात लिंबू देऊन जागेची पूजा केली. मांत्रिकाने मंत्रोपचार सुरू करून काही जणांनी खोल खड्डा खोदण्याला सुरुवात केली. तसेच गुप्तधनासाठी मुलीचा नरबळी देणे आवश्यक असल्याचे मांत्रिकाने सांगितले. हे ऐकून बाप नरबळी देण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय आला. तिने यवतमाळ येथील मित्राला खोदलेल्या खड्ड्यांचा फोटो पाठविला. त्याने सदर माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली.

पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिस पोहोचल्यावर गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या घटनेत सहभागी वडिलांसह मांत्रिक व इतर नऊ जनांना अटक (accuse arrested) केली. त्यांच्याकडून पूजेचे साहित्य जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये वडिलांसह मांत्रिक वाल्मीक रमेश वानखेडे, विजय शेषराव बावणे, रमेश कवडू गुडेकार, विनोद नारायण चुनारकर, दीपक मनोहर श्रीरामे, आकाश शत्रुघ्न धनकसार, माधुरी विजय ठाकूर, माया प्रकाश संगमनेरकर यांचा समावेश आहे. आरोपींना यवतमाळ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Attempting to sacrifice a girl
मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर हल्ला; म्हणाले, राज्यपाल हे केवळ पोस्टमनसारखे

पीडितेवर बालपणापासूनच अत्याचार

आई सतत आजारी राहत असल्याने नराधम बापानेच वयाच्या १३ व्या वर्षांपासून अत्याचार (atrocity) केल्याचे मुलीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. तो नेहमीच तिला आई-बहिणीसह ठार मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद केले. मुलीच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com