शाळांपुढे पेच! प्रवेशपत्राविना प्रस्ताव अडचणीत

शाळांपुढे पेच! प्रवेशपत्राविना प्रस्ताव अडचणीत

अमरावती : दहावी आणि बारावीच्या, विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभाग लक्षात घेऊन सवलतीच्या गुणांचा लाभ दिल्या जातो. शाळांकडून क्रीडा विभागाकडे पाठविल्या जाणाऱ्या प्रस्तावासोबत हॉलतिकीट जोडले असते. परंतु परीक्षा रद्द झाल्याने हॉलतिकीट मिळाले नाही. त्यामुळे शाळांकडून क्रीडा विभागाकडे प्रस्ताव कसे पाठविल्या जातील, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (The proposal from the schools to the sports department without admission is in trouble)

शाळांपुढे पेच! प्रवेशपत्राविना प्रस्ताव अडचणीत
अरे बापरे! 9 हजारांचे विमानाचे तिकीट पडले 50 हजारात

शाळांकडून विद्यार्थी खेळाडूंच्या गुणांचे प्रस्ताव 20 जूनपर्यंत पाठवावे असे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून शाळांना कळविण्यात आले. त्यामध्ये हॉलतिकीट, प्रमाणपत्र जोडणे आवश्यक केलेले आहे. परंतु दहावी आणि त्या पाठोपाठ बारावीच्याही बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा इयत्ता आठवी नववीत शिकताना स्पर्धेतील सहभाग निश्चित करण्यात आला. तर, बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी इयत्ता अकरावीमध्ये स्पर्धेत सहभाग घेतला असावा. हॉलतिकीट, खेळांचे प्रमाणपत्र असे प्रस्तावासोबत जोडण्याचे आदेश आहेत. त्यानंतर प्रस्तावाची छाननी केल्या जाईल. दिलेल्या अटीशर्थीमध्ये हॉलतिकीट विद्यार्थ्यांजवळ नाही. त्यामुळे शाळांकडून क्रीडा विभागाकडे सवलतीच्या गुणांचा प्रस्ताव पाठविल्या गेला तरी तो ग्राह्य धरल्या जाईल काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शाळांपुढे पेच! प्रवेशपत्राविना प्रस्ताव अडचणीत
अमरावती विभागात डेंगीच्या रुग्णसंख्येत घट, तीन वर्षांत फक्त पाच बळी

सवलतीच्या क्रीडा गुणांचे प्रस्ताव शाळांकडून आले तरी त्यातील तांत्रिक मुद्दे लक्षात घेता वरिष्ठांकडे विचारणा केल्या जाईल. आदेशानुसारच सवलतीचे गुण मिळेतील. सकारात्मक तोडगा निश्चित निघेल.

- गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती.

शाळांपुढे पेच! प्रवेशपत्राविना प्रस्ताव अडचणीत
संचारबंदीत रस्त्यावर आरटीपीसीआर चाचणी; अमरावती महापालिकेचा उपक्रम

संभ्रमामुळे नुकसान खेळाडूंचेच

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शाळांना दररोज नवनवीन आदेश येत आहेत. पहिल्या आदेशाची पूर्तता होत नाही तोच दुसरा आदेश धडकतो, त्यामुळे शाळांपुढेही पेच निर्माण झाला आहे. विद्यार्थी (खेळाडूंचे) इयत्ता नववीचे पहिल्या सत्राचे पेपर घेतले नाही. त्यांच्या गुणांवर परिणाम निश्चित होणार आहे. (The proposal from the schools to the sports department without admission is in trouble)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com