उपासमार होणार नाही; डिस्टन्सिंगही राखल्या जाईल

AKO20A66561_pr.jpg
AKO20A66561_pr.jpg

मूर्तिजापूर (जि. अकोला) : कोरोना विषाणू विरुद्ध लढ्याच्या सावटात स्वयंसेवी संस्था किंवा दानशूर लोकांची मदत गरजवंतांपर्यंत नेमकेपणाने पोहोचण्याच्या दृष्टीने एका अभिनव उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन येथील उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सोमवारी केले.

लोकांच्या सहकार्याची त्यांना अपेक्षा
आभिनव संकल्पनेसंदर्भात ‘सकाळ’शी बोलतांना मोहिते म्हणाले, कोरोना विषाणूच्या जागतिक संकटामुळे आपल्या देशातही लॉकडाउन आहे. त्याअनुषंगाने वेगवेगळे धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर घेतले जात आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहू, तांदूळ गरजवंतांपर्यंत पोचले आहेत. मात्र, हातावर पोट असणारे, मजूर, बाहेरुन येऊन या उप विभागात अडकून पडलेले अशा लोकांना डाळ, चहा, साखर, तेल, मीठ, मिरची, हळद, भाजिपाला मिळणे आर्थिक स्रोतांअभावी दुरापास्त झाले आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न त्यासाठी पुरक ठरत आहेतच. परंतु, जेवण पुरविल्यास अशा गरजवंतांची केवळ एक वेळची व्यवस्था होईल. ही बाब विचारात घेऊन या सर्व वाणांची साधारणतः 500 रुपयांपर्यंतची कीट प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था किंवा दानदात्यांच्या समन्वयक सहभागातून उपलब्ध करून देण्याची संकल्पना मोहिते यांना सूचली. ती प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार त्यांनी केला. मात्र, त्यासाठी लोकांच्या सहकार्याची त्यांना अपेक्षा आहे.

अशी आहे संकल्पना
कोरोनाच्या संकटात मदत करू इच्छिणारे सीएम, पीएम फंडाला मदत करू शकतात. एक पर्याय असाही आहे की, स्थानिक स्तरावरील मदत थेट गरजवंतांपर्यत पोहोचेल. जसजशा अडचणी समोर येतात, तसतशी प्रशासनाकडे मागणी नोंदविली जाते. लगेच मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यापैकी कुणीतरी जाऊन खात्री करून घेईल. मदत करू इच्छीणारांची यादी प्रशासनाकडे असेल. आवश्यकतेनुसार त्यापैकी क्रमवारीने पाचारण करून प्रशासनातील एक जण शासकीय वाहनातून दानदात्यांसमवेत जाऊन त्यांच्या संकल्पीत व आवश्यक कीटची खरेदी केली जाईल. संबधित दात्याच्या हस्ते प्रशासन प्रतिनिधीच्या उपस्थितीत संबंधित गरजवंताला किटचे वितरण होईल. दरम्यान सामाजिक अंतरही राखले जाईल.

या क्रमांकावर साधावा संपर्क
दानदात्यांचा पैसा त्यांच्या भागात त्यांच्या समक्ष वापरला जावा, अशा या योजनेच्या मुळाशी 'कुणीही उपाशी राहु नये', एवढीच प्रामाणिक भावना आहे. सध्या 30 एप्रील पर्यंत असणारा (पुढेही वाढू शकणारा) लॉकडाउन सर्वांना सुसह्य व्हावा, ही भूमिका. दानदात्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात एसडीओ अभयसिंह मोहिते (8453454545), उमेश निमकंडे (9763525117), श्री. बागडे (9921994956) यांच्याशी संपर्क साधावा.
-अभयसिंह मोहिते, उपजिल्हाधिकारी, मूर्तिजापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com