त्यांना हवी आहे जिनावाली आझादी

bjp
bjp

अकोला : देशाची फाळणी करताना दोन्ही देशातील अल्पसंख्यांकांवर धर्माच्या नावावर अत्याचार झाले तर त्यांना शरण देण्यासाठी एक करार केला. हा करार महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून झाला होता. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या धर्मावर अत्याचार झाल्यास भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम स्वरुपी उघडे राहतील, असे आश्‍वासन महात्मा गांधी यांनीच दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्तता पंतप्रतधान नरेंद्र मोदी आणि केंद्र गृहमंत्री अमित शाह यांनी केली. मात्र राजकारण करणाऱ्यांनी सीएएला विऱोध करीत आझादीचा नारा दिला. ही आझादी आता जिनावाली आझादीपर्यंत पोहोचली आहे. यावरून त्यांना पुन्हा देशाची फाळणी हवी  असल्याचे दिसते, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी गुरुवारी दिली.


अकोला शहरात गांधी रोडवरील खुले नाट्यगृहात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने विराट हुंकार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ता म्हणून बोलताना शिवराय कुळकर्णी यांनी उपरोक्त भाष्य केले. प्रास्ताविकातून विवेक बिडवई यांनी या सभेत्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सीएए, एनआरसीच्या विरोधात मोर्च, बंद करताना व्यावाऱ्यांना बळजबरीने धमावले जात आहे. त्यामुळे एकप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. ही चिंताजनक स्थिती असल्याचे बिडवई यांनी प्रास्ताविकातून मांडले. त्यावर बोलताना शिवराय कुळकर्णी यांनी ही केवळ एकट्या अकोल्यतील स्थिती नाही तर संपूर्ण देशासाठी चिंता करण्याची बाब असल्याचे सांगितले. सीएएच्या विरोधात सुरू झालेला आझादीचा नारा आता जिनावाली आझादीपर्यंत पोहोचला आहे.

पुन्हा फाळणी​

जिनावाली आझादीचा अर्थ या देशाची पुन्हा फाळणी करणे होय. हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. या देशात कोण संविधानाची पायमल्ली करीत आहे,याचे उत्तर द्यावे. भीम स्मृतीला स्मरून संविधान मजबूत करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. मात्र भ्रामक प्रचार करून या देशात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला श्रोत्यांमध्ये आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मैसने, माजी महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक हरीश आलिमचंदाणी, सुनील क्षीरसागर, सरसंघचालक गोपाल खंडेलवाल, नरेंद्र देशपांडे, ॲड. मोतीसिंह मोहता आदींची उपस्थिती होती. विचारपीठावर विविध जाती-धर्मातील विचारवंत उपस्थित होते.

नेहरू-लिकायक खान करार
सीएए हा कायद कुणालाही देशाबाहेर काढण्यासाठी नाही. या उलट ज्या देशांमध्ये तेथील अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे, त्यांना भारतात शरण देण्यासाठी असलेला कायद आहे. धर्माच्या नावाखाली प्रताडीत केले जात असलेल्यांना भारतात शहर दिली जाईल, असे आश्‍वासन महात्मा गांधींनी फाळणीच्या वेळी दिले होते. लियाकत अली खान व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जो करार झाला होता, त्यातही याचा उल्लेख आहे. त्याची पुर्तता मोदी-शाह करीत आहे. याची जाणीव काँग्रेस नेत्यांना नसावी. ते व्होट बँकेवर डोळा ठेवून केवळ विरोध करीत आहे. या देशातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठीच सीएए हा कायदा असल्याचे कुळकर्णी म्हणाले. 

जनसंख्या नियंत्रण कायदा हवा
या देशात जनसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा आणि एनआरसीही लागू झाली पाहिजे, असा आग्रह धरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com