esakal | समाधान होईपर्यंत साडेतीन कोटी देऊ नका; आयकर विभाग, पोलिसांकडून अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

समाधान होईपर्यंत साडेतीन कोटी देऊ नका; न्यायालयात अर्ज

समाधान होईपर्यंत साडेतीन कोटी देऊ नका; न्यायालयात अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दोन वाहनांमध्ये ३ कोटी ५० लाखांची रोकड सापडल्याप्रकरणी आयकर विभागाने सुरू केलेल्या चौकशीमध्ये व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर सहा व्यक्तींकडून तपासात सहकार्य मिळत नसल्यामुळे ही रक्कम परत करू नये, असा युक्तिवाद आयकर विभागाने गुरुवारी (ता. २९) न्यायालयात केला. (Three-and-a-half-crores-Income-Tax-Department-Police-Amravati-Crime-News-nad86)

अमरावतीच्या सहदिवाणी न्यायाधीश (५) कनिष्ठस्तर जे. जी. वाघ यांच्या न्यायालयात नागपूर आयकर विभागाच्या दक्षता पथकाच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश जलतारे़, तर राजापेठ पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक मापारी यांनी स्वतंत्र पत्र दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेल्या पत्रात पैसा आला कोठून, याबाबत अधिकृत पुरावे व्यापाऱ्यांनी सादर केले नाही. त्यामुळे आयकर विभागाची चौकशी होईपर्यंत पैसा परत करू नये. शिवाय चौकशीची परवानगी पोलिसांना द्यावी, अशा आशयाचे पत्र न्यायालयात सादर केले.

हेही वाचा: अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

आयकर विभागाच्या दक्षता पथकाच्या वतीने अ‍ॅड. जलतारे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची चौकशी केली असता, हा पैसा आला कोठून याचे समाधान कुणी करू शकले नाही. हा विषय आयकर विभागाच्या अखत्यारीतील असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत पैसे परत न देता, शासकीय तिजोरीत जमा असू द्यावा, असे म्हटले.

आयकर विभागाच्या नागपूरच्या दक्षता पथकाने बुधवारी (ता. २८) पैशावर दावा करणाऱ्या व्यापाऱ्याचे सीए तसेच शिवदत्त महेंद्र गोहील, वाघेला जोराजी, रामदेव राठोर, नरेंद्र गोहील, नीलेश पटेल व जिग्नेश गिरीगोसावी आदींची याप्रकरणात चौकशी केली.

हेही वाचा: जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

रक्कम परत मिळावी

३ कोटी ५० लाखांच्या या रकमेवर अहमदाबाद येथील कृषी व्यापारी कमलेश शहा याने दावा केला आहे. त्याच्या वतीने चार्टर्ड अकाउंटंट मयूर शहा आणि अ‍ॅड. मनोजकुमार मिश्रा यांनी पैसे परत मिळावे, यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. ही रक्कम कंपनीची अधिकृत रक्कम आहे. पोलिसांनी यात अद्याप कोणताही दखलपात्र गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे रक्कम सुपूर्दनाम्यावर परत मिळावी, अशी भूमिका संबंधित व्यापाऱ्याच्या वतीने अ‍ॅड. मनोजकुमार मिश्रा यांनी न्यायालयात बाजू मांडतांना घेतली.

(Three-and-a-half-crores-Income-Tax-Department-Police-Amravati-Crime-News-nad86)

loading image
go to top