अमरावतीमध्ये तिघांचा अपघाती मृत्यू, दोन गंभीर जखमी

संतोष ताकपिरे
Thursday, 15 October 2020

अकोला येथून बोलेरो चिखलदराकडे जात असताना रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास येवदा ठाण्याच्या हद्दीत रुस्तमपूर फाट्यावर असलेल्या प्रवासी निवाऱ्यावर जोरदार धडकली. अपघातात पाचही जण गंभीर जखमी झाले. ज

अमरावती : ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. येवदा व खोलापूर ठाण्याच्या हद्दीमध्ये या घटना घडल्या.

अकोला येथून बोलेरो चिखलदराकडे जात असताना रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास येवदा ठाण्याच्या हद्दीत रुस्तमपूर फाट्यावर असलेल्या प्रवासी निवाऱ्यावर जोरदार धडकली. अपघातात पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी महेश माधव गव्हाळे (वय 42, रा. गीतानगर, अकोला व संतोष नाजूकराव घोरड (वय 42, रा. हिंगणा म्हैसपूर) यांचा मृत्यू झाला असल्याचे येवदा पोलिसांनी सांगितले. बोलेरो वेगात असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. या घटनेत वाहनचालक रोहित कैलास खडसे, राहुल संतोष शिरकरे हे दोघे जखमी झाले. विश्‍वनाथ ओंकार इंगळे (वय 55) यांच्या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी वाहनचालक रोहित खडसेविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

हेही वाचा - उपराजधानीत एसपींच्या बदलीचे राजकारण; शिवसेना आणि गृहमंत्र्यांमध्ये सुरू आहे संघर्ष!

खोलापूर ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपासमोरील वळणावर अपघाताची तिसरी घटना घडली. जयवंत भाऊराव बोरेकर (वय 55, रा. कसबा खोलापूर) हे बारमधील ड्यूटी आटोपल्यानंतर गावाकडे दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोने दुचाकीला उडविले. अपघातात दुचाकीस्वार जयवंत बोरेकर यांचा मृत्यू झाला. संजय बाबूराव बोरेकर यांच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three died in road accident at amravati