विदर्भातील आत्महत्येचे सत्र काही संपेना; तीन शेतकऱ्यांचा गेल जीव

टीम ई सकाळ
Monday, 16 November 2020

तिसऱ्या घटनेत, यवतमाळ जिल्ह्यातील कारखेड येथील शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याच्या मुलाने, माझ्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले असून आरोपींविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. त्यावरून चार जणांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : कृष्णापूर येथील विजय विठ्ठल दहिफळे (वय ४२) या शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

विजय दहिफळे यांच्याकडे सामायिक तीन एकर शेती आहे. त्यात यावर्षी सोयाबीनचे फक्त ५० किलो उत्पन्न झाले. बटईने केलेल्या पाच एकर शेतातून आजपर्यंत फक्त तीन क्विंटल कापूस घरी आला. सोयाबीननंतर कपाशीच्या पिकानेही दगा दिला. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहेत. किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी दहिफळे कुटुंबाचे सांत्वन केले.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

दुसऱ्या घटनेत, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी शेतात ओलित करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. मौजा बोरखेडी शिवारात रविवारी (ता. १५) दुपारी दोन वाजता ही घटना घडली. कल्याण निळकंठ सावरकर (वय ३५, रा. टाकळी झडशी) असे मृताचे नाव आहे.

कल्याण सावरकर शेतात ओलित करीत असताना त्यांचा वीजतारांना स्पर्श झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. कल्याणला घरी येण्यास उशीर झाल्याने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता तो प्रतिउत्तर देत नव्हता. शेतात जाऊन बघितल्यावर ही घटना उघडकीस आली.

तिसऱ्या घटनेत, यवतमाळ जिल्ह्यातील कारखेड येथील शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याच्या मुलाने, माझ्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले असून आरोपींविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. त्यावरून चार जणांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

सुभाष तुकाराम कदम (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची कारखेड येथे शेती आहे. शेतातील सोयाबीन काढणीस आले असता मारोतराव कदम, सोनू कदम, परमानंद कदम व भुजंग कदम (रा. सर्व कारखेड) यांनी दोन दिवसांपूर्वी वाद घालून सुभाष कदम यांना मारहाण केली होती. तशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three farmers commit suicide in Vidarbha