विदर्भात वीज अंगावर केसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

विदर्भात वीज अंगावर केसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
Updated on

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या (Three farmers killed) वरझडी येथील ३७ वर्षीय शेतकऱ्‍याचा वीज पडून मृत्यू झाला; तर दोन महिला जखमी (Two women injured) झाल्या. ही घटना बुधवारी (ता. ७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. शंकर गणपत लोणबले (वय ४०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्‍याचे नाव आहे. (Three-farmers-killed-in-lightning-strike-in-Vidarbha)

सध्या शेतीची मशागत सुरू असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबताना दिसत आहेत. बुधवारी (ता. ७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वरझडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शंकर शेतात काम करीत होते. पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करणाऱ्या दोन महिलांनी झोपडीत आसरा घेतला; तर शंकर झोपडीलगतच असलेल्या झाडाखाली उभे होते. त्यांच्या अंगावर वीज कोसळली. तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शंकर यांना मृत घोषित केले. जखमी दोन्ही महिलांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

विदर्भात वीज अंगावर केसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
१२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील खातेरा येथे वीज कोसळून २६ शेळ्या ठार झाल्या. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. दुपारी खातेरा परिसरात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला. वीज कोसळून २६ शेळ्या ठार झाल्या. यामध्ये बळीराम गोडे यांच्या तीन शेळ्या, धर्मा वाघाडे यांची एक, शरद बुट्टे यांच्या दोन, शंकर गायकवाड यांच्या दोन, दत्ता जुंगरी यांची एक, तसेच नारायण भोयर यांची एक, अंबादास वासेकर यांची एक, विकास आगरकर यांच्या तीन, सचिन पांडे यांच्या पाच, पंढरी गेडाम यांच्या पाच, अमोल सोनटक्के यांची एक व इतर अशा एकूण २६ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन बैल ठार

मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरातील बंदरपोड येथे वीज कोसळल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. वासुदेव आत्राम नामक शेतकरी शेतात डवरणी करीत असताना पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्‍याने बैलजोडीला लिंबाच्या झाडाखाली बांधले आणि ते शेतालगत असलेल्या घरात गेले. काही वेळानंतर अचानक जोरदार पावसासह विजेचा कडकडाट झाला. यावेळी आत्राम यांनी बाहेर बघितले असता लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यात दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.

विदर्भात वीज अंगावर केसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
‘कमळ’ बेपत्ता? अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की

वीज पडून शेतकरी ठार

चंद्रपुरात बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या पावसात वीज पडून वारलू जंगलूजी रामटेके (वय ४५, रा. लक्कडकोट) यांचा मृत झाला. वारलू रामटेके शेतात कामे करीत होते. दुपारी अचानकपणे विजाच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात असतानाच रामटेके यांच्यावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच शेजारील शेतकऱ्यांनी मोक्यावर धाव घेत पोलिस व महसूल अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

(Three-farmers-killed-in-lightning-strike-in-Vidarbha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com