बत्तीस वर्षीय युवक मावशीला दुचाकीने घेऊन जात होता; अपघातात दोघांचाही गेला जीव

संतोष ताकपिरे
Sunday, 18 October 2020

अपघाताची दुसरी घटना माहुली जहॉंगीर ठाण्याच्या हद्दीत सनब्राइट शाळेजवळ घडली. संतोष प्रेमलाल धुर्वे (वय ३५) व सोनू नंदलाल टेकाम (वय २७, दोघेही रा. शिरखेड) हे एमएच २७ एएक्‍स २९७१ क्रमांकाच्या दुचाकीने नांदगावपेठ येथून शिरखेडला जात होते. शाळेजवळ असताना भरधाव दुचाकी लोखंडी कठड्यावर जाऊन धडकली.

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. बारा तासांत अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांत तीन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. धारणी, माहुली जहॉंगीर व सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

विनोद मोहन कोरकू (वय ३२, रा. रतागढ, मध्य प्रदेश) हा त्याची मावशी लीलाबाई गोपाल भिलावेकर (रा. शिरपूर) यांच्यासह एमएच ६८ एमई ८४६० क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूर ते धूळघाटकडे जात होता. मात्र, धूळघाटजवळ एमएच २७ एवाय ६०९१ क्रमांकाच्या दुचाकीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात विनोदसह मावशी, असे दोघे जखमी झाले. गंभीर जखमी लीलाबाई भिलावेकर यांचा मृत्यू झाला. धारणी पोलिसांनी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाणून घ्या - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

अपघाताची दुसरी घटना माहुली जहॉंगीर ठाण्याच्या हद्दीत सनब्राइट शाळेजवळ घडली. संतोष प्रेमलाल धुर्वे (वय ३५) व सोनू नंदलाल टेकाम (वय २७, दोघेही रा. शिरखेड) हे एमएच २७ एएक्‍स २९७१ क्रमांकाच्या दुचाकीने नांदगावपेठ येथून शिरखेडला जात होते. शाळेजवळ असताना भरधाव दुचाकी लोखंडी कठड्यावर जाऊन धडकली. त्यात संतोष व सोनू असे दोघे जखमी झाले. जखमींपैकी संतोष धुर्वे याचा जागीच मृत्यू झाला. प्रेमलाल धुर्वे यांच्या तक्रारीवरून माहुली जहॉंगीर पोलिसांनी मृत दुचाकीस्वाराविरुद्धच गुन्हा दाखल केला.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

अपघाताची तिसरी घटना अचलपूर तालुक्‍यातील बेलज फाटा ते गुणवंत महाराज मंदिराजवळच्या पुलावर घडली. मंदिरात दर्शन करून चांदूरबाजार ते अचलपूर मार्गाने घराकडे जात असताना ही घटना घडली. दिलीप पंजाब गवई यांचा लहान भावास कुण्यातरी वाहनाने धडक दिली. त्यात जखमी भावाचा मृत्यू झाला. गवई यांच्या तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in Amravati accident