आयुर्वेद-अभियांत्रिकीने केले ‘ऑल इज वेल’; दोन भावंडामुळे ३० रुग्णांची कोविडवर मात

जुगाड तंत्रातून बनविलेले सिलिंडर
जुगाड तंत्रातून बनविलेले सिलिंडर

मांजरखेड क (जि. अमरावती) : ‘जब लाईफ हो आउट ऑफ कंट्रोल...’ या थ्री इडियट्स चित्रपटातील गाण्याप्रमाणे वर्धा येथील दोन भावंडांनी अंगी असलेल्या कौशल्यांचा वापर करून घरातील व मित्र परिवारातील एक दोन नव्हे तर ३० पेक्षा अधिक रुग्णांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार (Ayurvedic treatment) करून कोरोनावर (coronavirus) मात केली आहे. ज्या काळात रुग्णालयात बेड मिळणे दुरापास्त होते त्याकाळात बाहुटे बंधूंनी आयुर्वेदाला अभियांत्रिकीची जोड देत तीन गंभीर रुग्णांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढत ऑल इज वेल केले आहे. (Through-the-hard-work-of-two-siblings-30-patients-overcame-the-corona-in-Amravati)

मूळ दाभा येथील बाहुटे कुटुंबात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. याच कुटुंबातील मोठा मुलगा डॉ. प्रतीक हा दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था येथे सध्या कोविड रुग्णाची सेवा करीत आहे. घरी वडील कोरोनाग्रस्त झाल्याने दिल्ली येथून काही औषधी व वैद्यकीय साहित्य गावाला पाठविले व लहान भावाच्या सहकार्यातून टेलिफोनिक मार्गदर्शन करून बरे केले.

जुगाड तंत्रातून बनविलेले सिलिंडर
Breaking : वर्धेच्या बँकेत शिरला सुसाईड बॉम्बर! केली पैशांची मागणी

दुसरीकडे याच परिवारातील वर्धा येथील कुटुंबातील सात पैकी पाच जण पॉझिटिव्ह आले. वर्धा शहरात एप्रिल-मे महिन्यात रुग्णालयात बेड मिळणे दुरापास्त असताना कुटुंबीयांनी घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. याच परिवारातील एक भाऊ फार्मासिस्ट व एक इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आहे. घरातील दोन रुग्ण ज्यांची ऑक्सिजन लेव्हल ८० च्या आसपास असताना दिल्ली येथून डॉ. प्रतीक याने सांगितलेल्या उपचारानुसार वर्धेत घरीच उपचार सुरू झाले. काही कालावधीत सर्वांची रिकव्हरी होऊ लागली.

याच दरम्यान बाहुटे यांचे चंद्रपुरातील व्याही यांचे परिवार पॉझिटिव्ह आले. यात शासकीय रुग्णालयात उपचार घेताना कुटुंबातील कर्त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पतीचे सुद्धा मनोधैर्य खचले. पत्नीचा मृत्यू त्यात हा गंभीर आजार त्यामुळे बाहुटे कुटुंबातील तरुणांनी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना चंद्रपूरहून वर्धा येथील घरी आणले. त्यावेळी त्यांची प्रकृती अतिगंभीर होती. या कालावधीत ऑक्सिजन सिलिंडर व इतर साहित्यांची जुळवाजुळव करीत जुगाड तंत्रज्ञानाने प्रेशर गेज, फ्लो मीटर लावून महेश याने अभियांत्रिकी कसब लावून ऑक्सिजन पातळी मेंटेन करीत टेलिफोनिक पद्धतीतून उपचार केले. त्यामुळे वाढई यांचे तब्येतीत सुधारणा झाली.

जुगाड तंत्रातून बनविलेले सिलिंडर
सुरजागड पहाडावर उत्खनन सुरूच; नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घातली नाही भीक

काळानेच सर्व शिकविले

दिल्लीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचा अनुभव होता. आप्तजनांतील अनेक कोरोनाग्रस्त होत होते. शेवटी बाहेरची परिस्थिती पाहून भावंडांच्या मदतीने उपचार केले. यात माझ्यापेक्षा भावंडांचे परिश्रम व कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरले असल्याचे डॉ. प्रतीक बाहुटे यांनी सांगितले.

(Through-the-hard-work-of-two-siblings-30-patients-overcame-the-corona-in-Amravati)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com