esakal | धक्कादायक! जंजिरा'ला लागला फास; रेसक्‍यू टीम टिपेश्‍वर अभयारण्यात दाखल

बोलून बातमी शोधा

tiger
धक्कादायक! जंजिरा'ला लागला फास; रेसक्‍यू टीम टिपेश्‍वर अभयारण्यात दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : टिपेश्‍वर अभयारण्यातील "जंजिरा'नावाच्या वाघाला फास लागला असून तो काढण्यासाठी रेसक्‍यू टीम अभयारण्यात दाखल झाली आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद

विदर्भात ताडोबानंतर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांची संख्यादेखील लक्षणीय आहे. वाघांचे दर्शन या ठिकाणी हमखास होत असल्याने पर्यटकांची चांगली गर्दी असते. अभयारण्यातील वन मारेगाव परिसरात जंजिरा नावाच्या वाघाचा पाय फासात अडकला. वाघाने आपला पाय त्यातून कसाबसा सोडविला असला तरी त्याच्या पायात तारेचा फास अडकून असल्याने त्याच्या पायाला जखम झाली आहे.

त्याच अवस्थेत तो जंगलात फिरत आहे. तो फास तसाच अडकून राहल्यास वाघाच्या जिवावरही बेतू शकते. मागिल वर्षी अशाचप्रकारे फास अडकून एका वाघाचा मृत्यू झाला होता. टिपेश्‍वर अभयारण्यात अशाप्रकारे तारांचा फास करून वाघांची शिकार केल्या जाते. सध्या या अभयारण्यात लॉकडाउनमुळे 1 मेपर्यंत पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे हा फास कुणी व का लावला, हे शोधण्याचे आव्हान वन विभागापुढे आहे.

हेही वाचा: लसीकरणानंतरही मृत्यू? ग्रामीण भागातील धक्कादायक प्रकार; प्रशासनाचे मात्र कानावर हात

टिपेश्‍वर अभयारण्यातील वनअधिकारी व कर्मचारी सध्या लॉकडाउनचा फायदा घेत आराम करीत आहेत. दरम्यान या वाघाचा फास काढण्यासाठी रेसक्‍यू टिमला अभयारण्यात पाचारण करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ