ब्राम्हणवाडा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह, शवविच्छेदन करताच बसला धक्का

tigress found dead in masod of wardha
tigress found dead in masod of wardha

मासोद (जि.वर्धा) : ढगा जंगलाच्या परिसरातील ब्राह्मणवाडा येथील क्षेत्रात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. ही घटना सोमवारी (ता. आठ) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या वाघिणीचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले असून तिचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. तरीही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर काय ते कळेल असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

ब्राह्मणवाडा जंगलात काम करीत असताना वनकर्मचारी, मजुरांना दुर्गंधी आली. या दुर्गंधीच्या दिशेने या कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता येथे या परिसरात वास्तव्य असलेली एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह पूर्णत: कुजली होती. यामुळे तिचा मृत्यू किती दिवसापूर्वी झाला याचा अंदाज कर्मचाऱ्यांना आला नाही. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.  माहिती मिळताच वर्धेवरुन प्रभारी उपवनसंरक्षक तुषार ढमढेरे यांच्या सूचनेने खरांगणा वनपरिक्षेत्र अधिकरी ठाकूर, आर्वी विभागाचे जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी या प्रकरणाची माहिती मानद वन्यजीव संरक्षक कौशल मिश्रा, आर्वी क्षेत्राचे अधिकारी आणि रोहना, खरांगना येथील पशू वैद्यकीय अधिकारी हजर झाले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डूा पराते, डॉ. अंधारे आणि डॉ. पाटील त्यांनी घटनास्थळीच वाघिणीचे शवविच्छेदन केले. यात त्यांनी क्षयरोग आणि पोटात कहीच  नसल्याने या वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्‍त केला. शवविच्छेदनानंतर घटनास्थळीच या वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

अंगावर कुठल्याही जखमा नाही -
जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या या वाघिणीचे वय सुमारे पाच वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. या वाघिणीच्या शरीरावर कोणत्याही जखमी नसल्याने तिची कोणाशी झुंज झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच काय ते खरे कारण कळणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. 

बाह्मणवाडा शिवारात वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तत्काळ घटनास्थळ गाठले. या वाघिणीचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तिच्या पोटात काहीच नसल्याची माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात आली. यामुळे तिचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा अंदाज आहे. तरीही खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. 
- तुषार ढमढेरे, उपवनसंरक्षक (प्रभारी) वर्धा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com