पत्ता विचारण्यासाठी थांबला आणि युवतीला कारमध्ये घेऊन गेला, पुढे काय झालं वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

वाहन चालवत असलेल्या 35 वर्षीय तरुणाने मी चंद्रपुरात आलो आहे, मला येथील काहीही माहिती नाही. तुम्ही माझ्याबरोबर चलाल तर बरे होईल अशी विनंती केली. युवतीने त्याची मदत करण्याचे ठरवले आणि वाहनाच्या मागील सीटवर जाऊन बसली. ती रस्ता सांगत असतानाच युवकाने वाहन जोरात पळवायला सुरुवात केली.

वणी (जि. यवतमाळ) : शहरातील एका खासगी रुग्णालयात युवती कार्यरत होती. ती आपले कर्तव्य पार पाडून एकटीच पायदळ घरी जाण्यासाठी निघाली. काही अंतर चालत गेल्यानंतर एक चारचाकी वाहन तिच्याजवळ येऊन थांबले. तरुणीने मागे वळून बधितले असता युवक गाडीतून उतरला आणि पता विचारू लागला. युवतीने त्या युवकाला पताही सांगितला. यानंतर जे घडले ते वाचून तुम्हालाही धक्‍का बसेल... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहरातील युवती एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. ती नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली. घराकडे जाण्यासाठी पायदळ निघाली असता वाटेत तिच्याजवळ पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन येऊन थांबले. वाहनातील युवकाने यवतमाळ मार्गावर असलेल्या एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा पता विचारला. तिनेही विचारलेला पत्ता सांगितला आणि घराकडे जाण्यासाठी निघाली.

महत्त्वाची बातमी -  सासूने हात पकडले, सासऱ्याने अंगावर रॉकेल शिंपडले, पती गळ्यावर वार करणार तोच...

मात्र, वाहन चालवत असलेल्या 35 वर्षीय तरुणाने मी चंद्रपुरात आलो आहे, मला येथील काहीही माहिती नाही. तुम्ही माझ्याबरोबर चलाल तर बरे होईल अशी विनंती केली. युवतीने त्याची मदत करण्याचे ठरवले आणि वाहनाच्या मागील सीटवर जाऊन बसली. ती रस्ता सांगत असतानाच युवकाने वाहन जोरात पळवायला सुरुवात केली. त्याने वाहन वेगाने सरळ नांदेपेरा मार्गाने नेले. अत्याचार केल्यानंतर युवतीला नांदेपेरा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ आणून सोडले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्घ अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. 

युवतीने केली आरडाओरड

मदतीच्या बहाण्याने युवतीला कारमध्ये बसविल्यानंतर युवकाने बायपास मार्गाने यवतमाळच्या दिशेने सुसाट वाहन पळविले. आपले अपहरण झाल्याचे लक्षात येताच तरुणीने आराडाओरड केली. मात्र, कारचे काच बंद असल्याने कुणालाही आवाज गेला नाही. तसेच कुणाचेही कारकडे लक्ष गेले नाही.

क्लिक करा - Video : धन्यवाद, आभार व्यक्‍त करताना त्यांना रडू कोसळत; न्यायालयानेही केले कौतुक, कोण आहेत 'ते'?

युवतीला ठार मारण्याची दिली धमकी

युवतीचे अपहरण केल्यानंतर वाहन सुसाट पळवून नेले. यानंतर चालकाने वाहन यवतमाळ मार्गावर थांबवून युवतीचा मोबाईल हिसकावला. युवतीला ठार मारण्याची धमकी दिऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्याच्या काही वेळांनी नांदेपेरा मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ युवतीला आणून सोडले. यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. 

युवती होती एकटी रडत

नांदेपेरा मागावरून जाणाऱ्या काही नागरिकांना युवती रडताना दिसली. त्यांनी युवतीकडे जाऊन बघितले असता काहीतरी वाईट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आस्थेने विचारपूर केली असता अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलिसांना पाठवून युवतीला पोलिस ठाण्यात आणले. पीडितेच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस वाहनचालकाचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture by abduction of a young woman in Yavatmal