यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 31 गुन्हेगारी टोळ्या सक्रिय

यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 31 गुन्हेगारी टोळ्या सक्रिय

यवतमाळ : जिल्हा कायम गुन्हेगारी (Crime in yavatmal) वर्तुळात चर्चेत राहिला आहे. मुंबई(Mumbai), नागपूरनंतर (Nagpur) यवतमाळचा क्रमांक लागतो. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळीतील सदस्य नेहमीच रणनीती आखतात. त्यातून रक्तपातासारख्या गंभीर घटनाही घडल्या आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासनाने ‘प्लस टू’योजना (Plus 2 scheme) हाती घेतली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात 31 गुन्हेगारी टोळ्या असल्याचे समोर आले. (total 31 criminal gangs in yavatmal district)

यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 31 गुन्हेगारी टोळ्या सक्रिय
अखेर 'तो' चिमुकला ठरला अंधश्रद्धेचा बळी; पोटावर चटके देण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू

चित्रपटात घडणार्‍या रंजक प्रसंगामुळे तरुण सोडाच अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहे. अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यास त्यांना शिक्षा होत नाही, असा काहीसा समज असल्याने गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा (विधीसंघर्षग्रस्त बालक) वापर करतात. तीन वर्षांपूर्वी खुनाच्या बहुतांश घटनांत विधीसंघर्षग्रस्त बालकांचाच सहभाग आढळून आला होता. लहान वयात गुन्हेगारी वर्तुळात पाऊल ठेवणार्‍या मुलांनीही परिसरात टोळ्या तयार केल्या आहेत.

गुन्हेगारी वर्तुळात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी खुनासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत प्रमुख टोळीत शांतता दिसत असली तरी आत ‘बदला’घेण्याची आग धगधगत आहे. 31 टोळीतील 105 जणांवर दोन व त्यापेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.

त्यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. गंभीर गुन्ह्यातील संशयितांच्या स्थानबद्घतेचे आदेश काढून त्यांची रवानगी कारागृहात केली जाणार आहे. आगामी काळात जिल्ह्यात गुन्हे घडणार नाही, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 31 गुन्हेगारी टोळ्या सक्रिय
शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच

तथाकथित भाई भूमिगत

दोनपेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्यांची कुंडली पोलिसांनी तयार केली आहे. त्यानुसार विविध प्रकारची कारवाई केली जाणार आहे. ‘टू-प्लस’ योजनेतून कुणीही सुटणार नाही. याची दक्षता पोलिस अधिकार्‍यांकडून घेतली जात आहे. आगामी काही दिवसांत होणारी कारवाई टाळण्यासाठी तथाकथित भाई भूमिगत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलिस त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

(total 31 criminal gangs in yavatmal district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com