Train Update : पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

Train
Trainesakal

अकोला, : गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलैपर्यंत नियोजित असलेली ही गाडी आता २८ व ३० जुलैपर्यंत धावणार आहे.

Train
Pune : खळबळजनक! शुक्रवार पेठेतील सदनिकेत आढळले दांपत्याचे मृतदेह

अप व डाऊन मार्गावर आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे. मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस येत्या ३० जून ते ३० जुलैपर्यंत दर शुक्रवार व रविवारी पुणे येथून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल.

Train
Uddhav Thackeray : ...तर आमचा मोदी सरकारला जाहीर पाठिंबा; ठाकरेंचं 'या' मुद्यावर मोठं विधान

दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परभणी, हिंगोली या मार्गे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी (शनिवार व सोमवार) दुपारी २.५५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. ५ मिनिटांच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होणार आहे. गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस येत्या १ जूलै ते ३१ जुलैपर्यंत दर शनिवार व सोमवारी अमरावतीवरून ७ वाजून ५० मिनिटांनी रवाना होऊन बडनेरा-मूर्तिजापूर मार्गे त्याच दिवशी रात्री २१.२० अकोला स्थानकात दाखल होईल.

ही गाडी दुसऱ्या दिवशी (रविवार व मंगळवार) दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com