esakal | अरे बापरे! अंडे द्या नाहीतर कोंबडा द्या म्हणत, उचलले दगड, लोखंडी रॉड व कुऱ्हाड; मग सुरू झाले...
sakal

बोलून बातमी शोधा

crime story.jpg

आम्हाला अंडे द्या नाहीतर कोंबडा द्या, अशी मागणी केली. त्यांना अंडे व कोंबडा आमच्याकडे नाही, असे सांगितले.

अरे बापरे! अंडे द्या नाहीतर कोंबडा द्या म्हणत, उचलले दगड, लोखंडी रॉड व कुऱ्हाड; मग सुरू झाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : क्षुल्लक वादातून दोन गटात लोखंडी रॉड, कुऱ्हाड व दगडाने हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी गोशिंग येथे घडली. यात दोन्ही गटातील सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, नांदुरा तालुक्‍यातील गोशिंग येथील लखन मगन शेगर (30) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी गावातील गल्लीत गप्पा करीत उभा असताना गावातीलच प्रभाकर लक्ष्मण सावंत याने त्यांच्या पायाला दुचाकीचा धक्का मारला. या कारणावरून वाद होऊन प्रभाकर लक्ष्मण सावंत, विलास लक्ष्मण सावंत, सुमनबाई प्रभाकर सावंत, जयवंताबाई लक्ष्मण सावंत या चौघांनी फिर्यादी लखन मगन शेगर, भाऊ राम मगन शेगर, बहीण रेखाबाई सुखलाल बाबर या तिघांना रस्त्यावरील दगडांनी मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

 हेही वाचा - संतापजनक : त्याने विवाहितेच्या गळ्यावर ठेवला चाकू अन् मागील खोलीत नेऊन...

या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या गटातील सुमन प्रभाकर सावंत (वय 35) यांनी तक्रार दिली की, फिर्यादी घरी असताना गावातीलच लखन शेगर व सौदागर शिंदे हे हातात लोखंडी रॉड व कुऱ्हाड घेऊन घरासमोर आले. आम्हाला अंडे द्या नाहीतर कोंबडा द्या, अशी मागणी केली. त्यांना अंडे व कोंबडा आमच्याकडे नाही, असे सांगितले असता, दोघांनी वाद केला. 

आवश्यक वाचा - अहो आश्चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले ९० कोटी

या वादातून आरोपी लखन शेगर, सौदागर शिंदे, राम शेगर, शाम शेगर, आकाश शिंदे, गोच्या शिंदे, काळ्या शिंदे, प्रकाश शिंदे, रेखाबाई बाबर, धनाबाई बाबर यांनी संगनमत करून फिर्यादी सुमन प्रभाकर सावंत, पती प्रभाकर सावंत, दीर विलास सावंत, मुलगा गोविंदा सावंत यांना कुऱ्हाड, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त 10 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

जखमी उपचारासाठी बुलडाण्यात
दोन्ही गटातील जखमींना बुलडाणा येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यामुळे एका गटाने मंगळवारी तर दुसऱ्या गटाने बुधवारी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं मिलिंद सोनुने करीत आहेत.