वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात दोघे ठार

सिंदेवाही तालुक्यातील जंगलालगत असलेल्या अनेक गावांत वाघ, बिबट्याचा धुमाकुळ सुरू आहे.
Leopard and Tiger
Leopard and TigerSakal
Summary

सिंदेवाही तालुक्यातील जंगलालगत असलेल्या अनेक गावांत वाघ, बिबट्याचा धुमाकुळ सुरू आहे.

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) - सिंदेवाही तालुक्यातील जंगलालगत असलेल्या अनेक गावांत वाघ, (Tiger) बिबट्याचा (Leopard) धुमाकुळ सुरू आहे. उन्हाळा असल्याने घराबाहेर झोपलेल्या एका वृद्धावर बिबट्याने हल्ला (Attack) करून ठार (Death) केले, तर पवनपार जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (ता. १९) तालुक्यातील सरडपार आणि पवनपार येथे घडली. मृतांमध्ये शालीक बुधा नन्नावरे (वय ६५, रा. सरडपार) आणि सुरेश रामू लोनबले (वय ५०, रा. पवनपार) यांचा समावेश आहे. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघ, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत सरडपार हे गाव येते. हे गाव जंगलाला लागूनच आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण बाहेर झोपतात. सरडपार येथील शालिक बुधा नन्नावरे हे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री जेवण करून गोठ्याजवळ खाट टाकून झोपले. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गावात बिबट्याने प्रवेश केला. शालिक बुधा नन्नावरे हे घराबाहेर झोपून होते. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. घराबाहेर प्राण्याचा आवाज येत असल्याचे बघून घरातील सदस्यांनी बाहेर जाऊन बघितले. तेव्हा त्यांना शालीक नन्नावरे मृतावस्थेत पडून दिला.

दुसरी घटना याच तालुक्यातील पवनपार येथे घडली. सध्या मोहफुल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. हाताला कामे नसल्याने गावातील अनेकजण जंगलात सकाळीच मोहफुल वेचण्यासाठी जातात. सुरेश रामू लोनबले हा सकाळीच जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेला होता. जिथे तो मोहफुल वेचत होता. त्याच ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. त्याच्यासोबत मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्यांना सुरेशचा मृतदेह पडून दिसला. त्यानंतर त्यांनी गावात येऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर गाठले. घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन दिवसांआधी लगतच्या गडमौशी, मरेगाव येथे वाघाने गाय, बैलांवर हल्ला करून ठार केले. पवनपार, सरडपार परिसरातही वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com