esakal | सावधान! आता कुठेही खर्रा खाऊन थुंकू नका. नाहीतर होणार अशी कडक कारवाई.. वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

two government officers suspended as spit on floor by eating tobacco

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. थुंकीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर प्रतिबंध लावले आहे.

सावधान! आता कुठेही खर्रा खाऊन थुंकू नका. नाहीतर होणार अशी कडक कारवाई.. वाचा सविस्तर 

sakal_logo
By
खुशाल ठाकरे

कोरची (जि. गडचिरोली) : सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून यापासून बचाव करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. थुंकीमार्फतसुद्धा कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन वेळोवेळी जनजागृती करीत आहे. तरीसुद्धा कोरची येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातीलच एक कर्मचारी व तहसील कार्यालय परिसरात एक नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळले. दोघांवरही स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. थुंकीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर प्रतिबंध लावले आहे. या संकट काळात पोलिस विभाग, आरोग्य विभाग व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सर्वसामन्यांच्या रक्षणार्थ योगदान देत आहेत. 

हेही वाचा - तोडगा काढा : शेतकऱ्याने चक्क आमदारांचीच तहसीलदारांकडे केली तक्रार, वाचा काय आहे प्रकार

 प्रशासनाने केली दंडात्मक कारवाई

मात्र, एखादा कर्मचारीच जीवघेण्या आजाराचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरत असल्याचा प्रकार कोरची तालुक्‍यात उघडकीस आला आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एक कर्मचारी खर्रा खाऊन कार्यालयाच्या परिसरात थुंकतांना निदर्शनास आला. तसेच धानोरा तालुक्‍यातील एका नागरिकाने कोरची तहसील कार्यालयाच्या परिसरात पिचकारी मारून घाण केली. याप्रकरणी दोघांवरही स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. 

खर्रा खाऊन प्रवेश करू नका 

या कारवाईमुळे उघड्यावर थुंकणाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयातील नोडल अधिकारी नायब तहसीलदार रेखा बोके यांनी दंडाच्या रकमेची पावती दिली. तसेच सर्व विभागाला भेट देऊन कार्यालयात खर्रा खाऊन प्रवेश करू नये, अन्यथा कारवाई करू, अशा सूचना केल्या.

वाचा सविस्तर - कास्तकारांनो जीवावर उदार होऊ नका! शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी.. पण काय आहे कारण..वाचा  

नियम सर्वांना सारखेच

प्रशासन मुख्यत: सर्वसामान्य नागरिकांवरच कारवाईचा बडगा उगारीत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, कोरचीत एका शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्यामुळे प्रशासनावर सर्वसामन्यांचा विश्‍वास बसला आहे. तसेच सामान्य नागरिक असो की, सरकारी कर्मचारी कायदा सर्वांसाठीच सारखा आहे, हा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

संपादन - अथर्व  महांकाळ