पोलिस ठाण्यात दोन गटांचा धुमाकूळ; सोबत पेट्रोलची बॉटल

Two groups clashed at the police station Accompanied by a bottle of petrol
Two groups clashed at the police station Accompanied by a bottle of petrol
Updated on

अमरावती : विसावा कॉलनीमध्ये भाड्याचे घर खाली करण्यावरून उद्‌भवलेला वाद पेटला. गाडगेनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. नऊ) सायंकाळी आठ ते दहा जणांच्या जमावाने पोलिसांसोबत वाद घातला. काहींनी व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर अपलोड केले. एकाने सोबत पेट्रोलची बाटली आणल्यामुळे प्रकरण चांगलेच पेटले होते.

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार महिलांसह दोन्ही गटातील एकूण दहा जणांविरुद्ध पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ललित रामसंजीवन अग्नीहोत्री, भूषण गोविंद उईके, सौरभ धीरज निखाडे, सुमित हरिहर निखाडे, रोशन कृष्णराव घोरमाडे, राम मारोतराव तायडे, अभिजित अजय हिंगमिरे यांसह चार महिला, अशा एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

गाडगेनगर ठाण्याच्या आवारात आणलेल्या कारही पोलिसांनी जप्त केल्या. ज्या दोन गटाचा घर खाली करण्यावरून वाद सुरू होता, त्यांनी परस्परविरुद्ध तक्रारी केल्या. त्यात विनयभंग, लुटमारी, तोडफोड, मारहाणीचा आरोप करण्यात आला. त्यातही गुन्हे दाखल झाले. सदर महिला विसावा कॉलनीमध्ये भावेश हिंमतलाल पोपट यांच्या घरी कुटुंबासह भाड्याने राहते. त्यांचे घर व प्लॉट खाली करण्यावरून वाद झाला. महिलेस संशयित आरोपी भावेश पोपट, मिलन पोपट, अर्पित पोपटसह अन्य एक, अशा चौघांनी शिवीगाळ केली.

महिला व तिच्या मैत्रिणीसोबत असभ्य वर्तन केले. घरातील टीव्ही फोडून नुकसान केले. शिवाय घरातून २० ग्रॅमच्या सोन्याचे एक लाख रुपये किमतीच्या चेन गहाळ झाल्या. दोन्ही महिलांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले, असा आरोप पीडितेने तक्रारीत केल्यानंतर चौघांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. परस्परविरुद्ध बाजूने अन्य एका महिलेनेही तक्रार केली. त्यामध्ये ललित रामसंजीवन अग्नीहोत्री, अभिजित अजय हिंगमिरेसह एक महिला, असे तिघे सदर महिलेच्या घरी गेले.

घरातील अन्य महिलेसोबत वाद घालून मारहाण केली. मंगळसूत्र आणि पर्समधील ३२ हजारांची रोकड हिसकावली व मारहाण करून असभ्य वर्तन केले, असा आरोप तक्रारीत केला. त्यावरून नमूद तिघांविरुद्धही गुन्हे दाखल केले. ठाण्यात गदारोळ घालणाऱ्या दोन्ही गटांतील चार महिलांसह अटकेतील एकूण दहा जणांना पोलिसांनी बुधवारी न्यायाल न्यायासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी केलेली कारवाई नियमानुसार
शासकीय कामात अडथळा, ठाण्यात नियमबाह्य वर्तन करणाऱ्या दोन्ही गटांविरुद्ध पोलिसांनी केलेली कारवाई नियमानुसार आहे.
- आसाराम चोरमले,
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com