कारंजा (घाडगे) (जि. वर्धा) : दारूची नशा चढली की कोण काय करेल, याचा काही नेम नाही. दोन भावंडांनी मनसोक्त दारू प्यायली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला अन् वादाचे पर्यवसान लहान भावाच्या खुनात झाले. सायवानकर यांचे धानोली येथे संयुक्त कुटुंब आहे.
या कुटुंबात विश्वास आणि दीपक हे दोघे भावंडे आहेत. त्यांच्यात घरगुती कारणावरून नेहमीच वाद होतात. यानंतर पुन्हा ते एकत्र येतात. यात गुरुवारीही त्यांच्यात वाद झाला. पण, कामानंतर सायंकाळी दोघेही सोबत शेजारी गावात गेले.
येथे दारू पिऊन ते गावात आले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादात थोरला भाऊ विश्वासने लोखंडी रॉडने दीपकवर वार केला. यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्या डोक्याला जबर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
क्लिक करा : वऱ्हांड्यात जेवण केल्यानंतर तेथेच झोपी गेल्या मग निघाला विळा
या घटनेची गावात माहिती पोहोचताच ती कारंजा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळ गाठण्यात आले. सायंकाळच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र शेटे, उपनिरीक्षक योगेश चायर, योगेंद्र यादव, नीरज लोही, नीलेश मुंडे, उमेश खामनकर पोलिस कर्मचारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.