Amravati News : एसटी बसगाडी दरीत कोसळल्याने दोन महिला ठार, २५ प्रवासी जखमी; जवाहरकुंड गावाजवळची घटना

चिखलदरा तालुक्यातील परतवाडा ते धारणी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून परतवाडा आगाराची एसटी बसगाडी रस्त्यापासून ५० फूट अंतरापर्यंत दरीत शिरली. अपघातात दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २५ प्रवासी गंभीर जखमी झाले.
Two women killed 25 passengers injured as ST bus accident Incident near Jawaharkund village
Two women killed 25 passengers injured as ST bus accident Incident near Jawaharkund villageSakal

चिखलदरा : चिखलदरा तालुक्यातील परतवाडा ते धारणी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून परतवाडा आगाराची एसटी बसगाडी रस्त्यापासून ५० फूट अंतरापर्यंत दरीत शिरली. अपघातात दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २५ प्रवासी गंभीर जखमी झाले.

रविवारी (ता.२४) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. इंदू गणत्रे (वय ६०, रा. मोरी खकणार, मध्य प्रदेश) व ललिता चिमोटे (वय ३०, रा. बुरजघाट, ता. अचलपूर), अशी अपघातातील मृत महिला प्रवाशांची नावे असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली. अपघातग्रस्त एसटी परतवाडा आगाराची आहे.

जखमी प्रवाशांना सेमाडोह प्राथमिक आरोग्यकेंद्र, त्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. गंभीर जखमींना उशिरा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. एमएच ०७ ई ९४७९ क्रमांकाची एसटी बसगाडी परतवाड्यावरून मध्य प्रदेशातील तुकईथड येथे जाण्यास निघाली.

जवाहरकुंड जवळ वळण रस्त्यावर एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अनियंत्रित एसटी बसगाडी रस्त्यापासून ५० फूट अंतरावर दरीत कोसळली. एका झाडावर अडकल्याने इतरांचा जीव वाचला. या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकासह दुचाकीस्वारांनी अपघातग्रस्त एसटीतील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. वृत्त लिहीस्तोवर चिखलदरा पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com