esakal | ई-रिक्षाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगारासाठी मदत मिळेल, गडकरींकडून बच्चू कडूंच्या उपक्रमाचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

union minister nitin gadkari praised bacchu kadu for e rikshaw distribution to the physically disabled people in amravati

शासनातर्फे दिव्यांगांसाठी विशेष योजना राबविणे सुरू आहे. मात्र, या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचे खरे काम राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. 

ई-रिक्षाच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगारासाठी मदत मिळेल, गडकरींकडून बच्चू कडूंच्या उपक्रमाचे कौतुक

sakal_logo
By
शरद केदार

चांदुर बाजार (जि. अमरावती): समाजातील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अपंगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केलेली धडपड सर्वश्रुत आहे. ई-रिक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगार निर्मितीसाठी निश्‍चितच मदत मिळेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुरळपूर्ण येथे आयोजित ई-रिक्षा वितरण समारंभाच्या ऑनलाईन उद्‌घाटनाच्या वेळी व्यक्त केले.

हेही वाचा - अखेर कोरोना चाचणी केंद्र सुरू, मध्य रेल्वेतील कर्मचारी व कुटुंबीयांना दिलासा

सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारा संचालित पूर्णमाय अपंग निराधार मदत केंद्र येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून तथा खादी व ग्रामोद्योग विकास आयोग यांच्या सौजन्याने दिव्यांगासाठी फिरते विक्री केंद्रासाठी ई- रिक्षा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन केले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नयना कडू व खादी ग्रामोद्योग विभागाचे व्यवस्थापक कापसे हे उपस्थित होते.

हेही वाचा - नागपुरातील सिताबर्डी मुख्य रस्ता होणार 'व्हेईकल फ्री झोन', लवकरच प्रस्तावावर शिक्कामोर्तब

शासनातर्फे दिव्यांगांसाठी विशेष योजना राबविणे सुरू आहे. मात्र, या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचे खरे काम राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी बच्चू कडू म्हणाले, समाजातील उपेक्षित असणाऱ्या दिव्यांगांना समाजातील प्रत्येक घटकाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. असे झाल्यास कोणताच दिव्यांग बांधव रोजगारासाठी भटकणार नाही. उदबत्तीसारख्या लघु उद्योगाबरोबर कुंभार, सुतार यांच्यासाठी देखील स्वयंरोजगार उभारू व या परिसराची ओळख संपूर्ण देशात निर्माण करू असे सुद्धा ते म्हणाले. यावेळी बच्चू कडू यांनी पहिल्या टप्यात 200 दिव्यांगांना रोजगार निर्मिती करून देण्याचे जाहीर केले. याप्रसंगी समितीचे सभापती राजेश वाटणे, सदस्य संतोष किटूकले, मुन्ना बोडे, संस्थेचे सचिव राहुल म्हाला, दीपक भोंगाडे, बाजार समितीचे सदस्य मंगेश देशमुख, रवी सूर्यवंशी, अतुल माणेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - भाग्यश्री राऊत