Unknown people fire out rice crops a farmer in Gadchiroli
Unknown people fire out rice crops a farmer in Gadchiroli

संध्याकाळी घरी आल्यानंतर अचानक शेतात दिसला धूर; जाऊन बघताच बळीराजाच्या डोळ्यांत आले पाणी 

चामोर्शी (जि. गडचिरोली) : शहरातील हनुमाननगर प्रभाग 14 मध्ये राहणारे बाबूराव कुनघाडकर यांच्या लालडोंगरीजवळ असलेल्या शेतातील धानाच्या दोन पुंजण्यांना अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने पुंजणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने कुनघाडकर परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

गेल्या आठ वर्षांपासून नामदेव उंदीरवाडे यांची सात एकर शेती बाबूराव कुनघाडकर भाडेपट्टीने करीत होते. सात दिवसांपूर्वीच धान कापणी करून चुरणे करण्यासाठी मशिनच्या शोधात असतानाच सोमवार (ता. 7) बाबूराव कुनघाडकर व त्यांच्या पत्नी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शेतात पाहणी करून घरी आल्यानंतर रात्री 7 ते 8 वाजताच्या दरम्यान व्यक्तींनी धानाच्या दोन पुंजण्यांना आग लावली. 

पुंजणे जळत असल्याची माहिती मिळताच कुनघाडकर परिवाराने शेताकडे धाव घेतली. त्यावेळी पुंजणे जळत होते. दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकारी यांना माहिती देताच पाण्याच्या टॅंकरसह नगरपंचायतीचे कर्मचारी आले. मात्र, शेतात टॅंकर जाण्यास रस्ता अवघड असल्याने शर्थीचे प्रयत्न करूनही पुंजण्याजवळ टॅंकर जाऊ शकला नाही. 

आपल्या डोळ्यांदेखत कष्टाने पिकवलेले धान जळताना बघण्याशिवाय कुनघाडकर परिवाराकडे कोणताच पर्याय उरला नाही. यात त्यांचे जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान पोलिस विभागाला ही माहिती दिल्यावर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. 

तलाठी कार्यालयाकडून कालिदास सरपे या कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करणार आहेत. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी कुनघाडकर परिवाराकडून करण्यात आली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com