esakal | धोकादायक ठरतोय अनलॉक : बाजारपेठ हाउसफुल्ल, मास्कविना अनेकांचा मुक्तसंचार
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक ठरतोय अनलॉक : मास्कविना अनेकांचा मुक्तसंचार

धोकादायक ठरतोय अनलॉक : मास्कविना अनेकांचा मुक्तसंचार

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : जिल्हा प्रशासनाकडून अनलॉक (Unlock) जाहीर करण्यात आल्यानंतर नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करून बाजारपेठेत गर्दी (Crowds in the market) करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आटोक्यात आलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा केव्हाही पुन्हा स्फोट (Anytime the corona patient increase) होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्हा सध्या फेज एकमध्ये असून रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील. (Unlocking-is-becoming-dangerous-in-Amravati)

जून महिन्यात सुरुवातीपासूनच कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. सुरुवातीला दरदिवशी एक हजार ते १,२०० अशी असलेली रुग्णसंख्या सध्या ५०च्या आत स्थिरावली आहे. मात्र, कोविड संपला, अशा भावात अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागू लागले आहे. शहरातील रस्त्यांवर सध्या ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

बाजारपेठेत कोविड नियमांना सर्रासपणे हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाकडून १६ जूनपासून सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नियमांनाच हरताळ फासले जात आहे.

त्रिसूत्रीचे पालन नाही

अनेक दुकानांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स या त्रिसूत्रीचे पालन होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, अद्याप या दुकानदारांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अनेक बेजबाबदार नागरिक कोविड संपल्याच्या भावात मास्क न घालताच बाजारपेठेत फिरताना दिसून येत आहेत.

व्यापक कारवाईची गरज

शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस तसेच मनपाच्या पथकाकडून नागरिकांची झाडाझडती घेतली जात आहे. मात्र, बहुसंख्य भागांत पथकच पोहोचत नसल्याने कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असून व्यापक कारवाई गरजेची असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

मोठ्या परिश्रमपूर्वक कोविडची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात आलेली आहे. नागरिकांनी केलेल्या त्रिसूत्रीच्या पालनामुळेच हे साध्य होऊ शकले. मात्र, आता पुढे बेजबाबदारपणे वागणे सोडले पाहिजे, तरच कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकू.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

आठवड्याभरातील रुग्णसंख्या

दिनांक : रुग्ण : मृत्यू

10 जून : 126 : 04

11 जून : 107 : 08

12 जून : 102 : 01

13 जून : 101 : 01

14 जून : 90 : 01

15 जून : 45 : 05

16 जून : 99 : 04

हेही वाचा: नोट फाटली तर काय करायचं? जाणून घ्या नियम

रुग्णवाढीचे संकेत

एकीकडे अनलॉक होत असतानाच रुग्णसंख्येचा ग्राफ घटल्याचे दिसून आले. मात्र, आता अनलॉक झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कालच ४५ वर आलेली रुग्णसंख्या १६ जूनला दुप्पट म्हणजेच ९० पर्यंत गेली. त्यावरून आता बेजबाबदारपणे वागल्यास रुग्णवाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहे.

(Unlocking-is-becoming-dangerous-in-Amravati)

loading image